सामाजिक
सामाजिक कार्यकर्ते पुंजा वाकचौरे यांचे निधन, अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त
अकोले दि. (नेहे पाटील यांजकडून ) कळस (ता. अकोले) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,व प्रगतशील शेतकरी पुंजा बापू वाकचौरे यांचे दि. 5 (आगस्ट रोजी) अल्पशा आजाराने निधन झाले.
नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे. संगमनेर, अकोले तालुक्यातील कला क्रीडा शौक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे त्यांच प्रमाणे शेती व्यवसायासंदर्भात ही त्यांचे कार्य असून त्यांच्या वैकुंठ गमनामुळे नगर जिल्यातील सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
महाराष्ट राज्य सोशल मीडिया सेलचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांचे वडिल पुंजा बापु वाकचौरे वडील असून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार नेहे पाटील यांचे पुंजा हे मामा होते, त्यांचा दशक्रियाविधी दिनांक 14 आगस्ट 2024 रोजी सकाळी कळस (ता अकोले जि अहमदनगर )येथे होणार आहे.