शैक्षणिक
मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न : महाविद्यालयास वस्तू रूपाने देणगी प्रदान!!!
मंचर दि (प्रतिनिधी)- विद्यार्थी दषेतील विविध कडू गोड आठवणींना उजाळा देत मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या , महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या एसएससी बॅच मार्च १९९७ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.
आपण ज्या विद्यालयात शिक्षण घेऊन जीवनाची यशस्वी वाटचाल करतो आहोत त्या विद्यालयाबद्दल व शिक्षकांबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी देणे लागतो.याभूमिकेतून मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील शिक्षण घेतलेल्या मार्च १९९७ च्या एसएससी बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी मागील चार वर्षापासून एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे . या कार्यक्रमाचे औचित्य साधून या अगोदरही विद्यालयाला वस्तू रूपाने लाखोंची देणगी या बॅचकडून देण्यात आली.यावर्षी ही सुमारे रुपये ७० हजाराचे बारा स्क्रीन्स व बारा स्पीकर्स शाळेला भेट देण्यात आले. तसेच या बॅचमधील उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांमधून जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे व आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करावे असेही त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून भावना व्यक्त केल्या व शाळेला इथून पुढेही अशीच आमच्या परीने आम्ही मदत करू असे आश्वासन विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांना देण्यात आले.
आपल्या जीवनात विविध क्षेत्रात यशस्वी माजी विद्यार्थी यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात या बॅचमधील माजी विद्यार्थी ॲड. राहुल पडवळ यांनी सन २१- २२ मध्ये कृषी शास्त्रातील पदवी प्राप्त केल्यामुळे नाशिक विद्यापीठाकडून त्यांना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. व तसेच त्यांची आफ्रिकन इन्स्टिट्यूट मध्ये सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून झालेली निवड याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे सन १९९७ च्या बॅचचे प्रशांत वाळुंज,रॉकी काजळे,राजू मोरडे,राहुल पंदारे,अरुण निघोट,नितेश गांधी,संभाजी काळे,निलेश ठक्कर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक यादव चासकर यांनी मांनले सूत्रसंचालन संतोष मुंढे यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था दत्तात्रय खोरे,धीरज कोळेकर, दुर्गा चौधरी,प्रियंका गवळी, प्रतिमा पाटील,बाळकृष्ण केदारी यांनी पाहिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांनी केले.