राजकीय
“गुलाबी” रथात आरुड, उपमुख्यमंत्री अजित पवार “लाडक्या बहिणींचा” करणार सन्मान, तर कोणावर सोडणार टिकेचे बाण? : सर्वांची उत्सुकता शिगेला!!!
मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी राज्यभर सुरु केलेली जनसन्मान यात्रा (येत्या दि १८रोजी )पुणे जिल्ह्यात प्रवेश करीत असून आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील भव्य “रामनगरी मैदानावर” आपल्या गुलाबी जाकेटमध्ये गुलाबी वाहनात आरुड असलेले राज्याचे उपमुख्यामंत्री आपल्या लाडक्या बहिणींना सन्मान देत,विरोधकांवर टिकेचे बाण सोडून त्यांना कसे जर्जर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुती शासनाने जाहीर केलेली ” माझी लाडकी बहीण “योजनेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सोबत शासनाने आपल्या कार्यकाळात सुरु केलेल्या विविध योजनाची माहिती करून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वच कार्यकर्ते कामाला लागले आहेत पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी व लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुती सरकार मधील तिन्ही पक्षांनी कंबर कसली असल्याचे दिसत आहे.
मंचर (ता आंबेगाव) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या जनसन्मान यात्रेची माहिती देताना राष्ट्रवादि काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी विरोधकांवर टिका करताना खरपूस समाचार घेत आम्ही विकासात्मक काम करीत आहोत लाडकी बहीण योजने सह शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय सर्वांना माहिती व्हावेत यासाठी या संवाद यात्रेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सामान्य जनतेचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच मुद्दे नाहीत त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जनससन्मान यात्रेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मंचर मध्ये येत असून ते आगामी विधान सभेच्या पाश्वभूमीवर काय बोलणार? या बाबत सर्वत्र उत्सुकता आहे.
त्याचप्रमाणे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव न घेता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नुकत्याच झालेल्या संवाद यात्राच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहकार मंत्री वळसे पाटील यांच्ये नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अनेक नेत्यांनी वळसे पाटलांवर प्रचंड टिका केली होती. त्यामुळे मंचर येथील होणाऱ्या सन्मान यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या मेळाव्यात वळसे पाटील या टिकेला उत्तर देताना काय? बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.