सामाजिक

मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात “एक राखी सैनिकासांठी” हा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!!!!       

Published

on

मंचर दि. ( प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  रयत शिक्षण संस्थेच्या , महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर, यांच्यावतीने “एक राखी सैनिकांसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला.

 रक्षाबंधनचे औचित्य साधून  इयत्ता पाचवी ते दहावीच्या  विद्यार्थिनींनी  जमा केलेल्या राख्या विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांच्या शुभहस्ते सीमेवरील आर्मीच्या जवानांसाठी पाठविण्यात आल्या. माजी सैनिक रविंद्र रामभाऊ (माजी सैनिक संघटना आंबेगाव तालुका)थोरात यांच्याकडे 196 राख्या  सुपूर्द करण्यात आल्या.

 विद्यार्थिनींनी स्वतःच्या कौशल्याने या राख्या बनवल्या. याप्रसंगी  पर्यवेक्षक यादव चासकर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थिनींचा उस्फुर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे नियोजन अनिता चव्हाण व प्रतीमा पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version