शैक्षणिक

घोडेगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहत साजरा: स्वातंत्र्यदिनानिमित्त साकारली “कारगिल” विजयाची प्रतिकृती….

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी)   “कारगिल विजयाची” प्रतिकृती साकारली प्रतिकृती  डोळ्यांत साठवत घोडेगाव (ता आंबेगाव )येथील न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी भारत माता कि जय, वंदे मातरम घोषणा देत राष्ट्रीय ध्वजस मान वंदना दिली 

       

  आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या  जनता विद्या मंदिर, जुनिअर कॉलेज व न्यू इंग्लिश स्कूल प्रांगनात  ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकारी, सर्व संकुलाचे चेअरमन संचालक, विविध संकुलाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार पालक विद्यार्थी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व संकुलाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. 

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2024/08/1000063893.mp4

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या अनेक थोर नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संपूर्ण गावातून  सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. स्काऊट गाईड पथकाकडून संचलन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये  कारगिल विजयाची प्रतिकृतीचा सूंदर साकारण्यात आलेला देखवा  उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.

 दरम्यान विद्यालयाच्या प्राचार्या मेरिफ्लोरा डिसुझा, उपप्राचार्या रेखा आवारी तसेच महाविद्यालयाच्या  नववी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले बहुमोल योगदान दिले अनेक विषय शिक्षकांनी देखील हा देखावा सादर करण्यासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version