राजकीय
आंबेगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेस,उसळला “नागरिकांसह, महिलांचा विराट” जनसागर….!!!
मंचर दि (प्रतिनिधी) सर्वांच्या पसंतीस उतरलेली “माझी लाडकी बहीण योजना” यासह महायुती शासनाने सुरु केलेल्या विविध योजनाची माहिती जनतेला देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु केलेल्या जण सन्मान यात्रेनिमित्त मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या सभेस प्रचंड गर्दीचा महाकाय जण सागर उसळला होता.
लोकसभेमध्ये महा युतीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे महाराष्ट्र विधान सभेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. महायुती शासनाच्या प्रचंड लोकप्रिय ठरत असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने” विरोधकांना कामलीच्या पेचात टाकले आहे. समाज्याच्या सर्व स्थरातील महिला वर्गाकडून या योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र भर सुरु करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेस सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत असून आज (दि १८रोजी) आयोजित सभेस नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरु करण्यात आलेल्या रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूत सहभाग घेतला. यावेळी अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
सुमारे तीन किलोमीटर असलेल्या रामनगरी येथील सभास्थळी जाईपर्यंत आंबेगावकरांनी प्रचंड गर्दी केली होती. मंचर शहरात सर्वत्र ठिकठिकाणी पक्षाच्या झेंड्यासह लाडकी बहीण योजना याचे फलक व झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण मंचर शहरात एक वेगळेच उत्साहाचे वातावरण दिसत होते. तसेच आयोजित रॅली मध्ये अजित पवार झिंदाबाद , सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील झिंदाबाद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सारा आसमंत दाणानून सोडला होता.
दरम्यान प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी प्रचंड महाकाय गर्दीचा जणू जणसागरच ऊसळला असल्याचे दिसत होते. सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये प्रचंड गर्दी झाली होती. यात लाडक्या बहिनींची उपस्थिती प्रचंड प्रमाणावर होती. सभेच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मंडपाबाहेर देखील आंबेगावकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेक ठिकाणी जगा मिळेल तिथे नागरिक उभे राहून उपमुख्यमंत्री अजित पवारआपल्या भाषणातून काय? बोलतात हे लक्ष देऊन ऐकत होते.
आंबेगाव विधान सभा मतदार संघात येणाऱ्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर व आहुपे खोऱ्यापासून तर पूर्व भागातील मतदार संघात येणाऱ्या विविध गावान्साह शिरूर तालुक्यातील चाळीस गावातील नागरिक यात हजारो महिलावर्ग, तरुणयुवक यांच्यासाह वृद्धनागरिक, शेतकरी यांनी प्रचंड प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना कसरत करावी लागतं होती.
-: “दिलीपराव एकच राजा” :-
आंबेगाव तालुक्याच्या गाव,वाडी वस्तीवरून महिलांसह, प्रचंड नागरिकांनी मंचर शहरात गर्दी केली होती. यावेळी अनेक ठिकाणी नागरिकांच्या मुखातून आंबेगावांत गजावाजा, “दिलीपराव एकच राजा” हे गाणे गात उपस्थित मतदार आनंद व्यक्त करीत होते.