राजकीय
मा.नगरसेवक “रवी लांडगे” यांचा हजारो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश: भोसरीमध्ये महायुतीला कडवे आव्हान….!
पुणे दि (नेहे पाटील यांजकडून )हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भा. जा. पा ला रामराम ठोकत रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केल्यामुळे पुढील काळात पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात भा ज पा. पुढे कडवे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
समाजिक कार्याचा वसा हाती घेऊन त्या माध्यमातूनसुमारे चाळीस वर्षापूर्वी बाबासाहेब लांडगे यांनी भा ज पा पक्ष संघटनेने प्रभावीत होत दिवस रात्र प्रचंड मेहनत घेऊन,भारतीय जनता पक्ष वाढविला व फुलाविला. त्यांच्या नंतर त्यांचे बंधू अंकुशराव लांडगे यांचे देखील पक्ष वाढविण्यास फार मोठे योगदान आहे. महा पालिका क्षेत्रात लांडगे कुटुंबाने तळा गाळातील कार्यकर्त्याच्या समस्यांची सोडवणूक करून, संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तयार केले. परंतु दरम्यान च्या काळात अंकुशराव लांडगे चे अपघाती निधन झाले. त्यामुळे पक्ष कार्यात पोकळी निर्माण झाली असल्याचे दिसू लागले.
दरम्यान अविरतपणे सामाजिक कार्यात भाग असणाऱ्या या कुटुंबाने स्वतः ला सावरत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आपलें दुःख बाजूला सरुत सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य सुरु ठेवले. लांडगे कुटुंबाने पक्षात राहून परत पक्षाला बळकटी देण्यासाठी पक्षावाढीसाठी सातात्याने काम सुरूच ठेवले. यांच्या कार्याची दाखल घेत भा. ज. पा. ने देखील या दोघा बंधूंनी पक्षांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल “अंकुशराव” याच्या पत्नी आशाताई लांडगे यांना नगरसेवक पदासाठी तिकीट दिले यात आशाताई प्रचंड मतांनी विजयी झाल्या व त्यातून पक्ष वाढीस आणखीनच बळकटी मिळाली. त्या नंतर बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव रवि लांडगे यांना देखील बिनविरोध नगरसेवक केले गेले चाळीस वर्षात या कुटुंबातील लोकांनी पिंपरी चिंचवड शहरात जनतेची प्रमाणीक पणे सेवा करत पक्षाचा आदेशानुसार अहोरात्र काम केले.
भोसरी विधानसभेत भाजपा चा आमदार निवडून आणण्यात लांडगे कुटुंबाचे मोठे योगदान दिलेआहे. रवी लांडगे यांचा या परिसरातील सर्वसामान्य मतदारांशी नाळ जोडली असून तळागाळातील कार्यकर्त्याला मदतीचा हात देऊन अनेक कुटुंबं लांडगे यांनी उभी केली आहेत. असे आसताना देखील “रवि ” सारख्या एक प्रमाणीक कार्यकत्यावर व लांडगे कुटुंबावर पक्ष बदलण्याची वेळ का?आली याचे अवलोकन मात्र पक्षाकडून झालेच नाही.
दरम्यान रवि लांडगे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत (काल दि-२० रोजी) शिवसेना उध्दव ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे तोंडावर रवी लांडगे यांनी भा ज पा ला रामराम ठोकल्याने पुढील काळात विधानसभा निवडणुकीमध्ये भोसरी विधानसभेत सत्ताधारी भा ज पा समोर मोठे आव्हान निर्माण झाले.त्यामुळे सत्ताधारी प्रतिनिधी यांना पुढील निवडणूक सोपी नाही.
रवी लांडगे यांचा महा नगर पालिका क्षेत्रातील मतदारांशी असलेला जनसंपर्क, सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी, यामुळे पिंपरी चिंचवड महा नगर पालिका क्षेत्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची ताकद वाढली आहे.त्यामुळे पुढील काळात पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात भाजपाला मोठे आव्हान निर्माण झाले असल्याची चर्चा महानगर पालिका क्षेत्रात सुरु आहे.