राजकीय

भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज  कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?

Published

on

पुणेदि (नेहे पाटील यांजकडून ) भाजपाला सोडचिठठी देत माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये फूट पडण्याचे दिसत असून, भोसरी विधानसभा मतदार संघातील आणखी असंख्य निष्ठावान भा ज पा चे कार्यकर्ते पक्षाला राम राम ठोकून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात  प्रवेश करणार असल्याची चर्चा मोठया प्रमाणावर  सुरु झाली आहे.

 

भोसरी मतदार संघावर अनेक निष्ठावांत कार्यकर्त्यांच्या जीवावर भाजपा ने अधिराज्य गाजविले परंतु विधान सभेवर पक्षाचा प्रतिनिधी निवडून येऊन देखील सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात येथील लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहेत.

अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना निर्माण झाली आहे. कारण  ज्या भाजपा  कार्यकर्त्यांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांना दिलेली आश्वासने येथील  लोकप्रतिनिधी कडून पूर्ण न झाल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.

दरम्यान संपूर्ण भोसरी  मतदार संघात पाणी,स्वच्छता,वाहतूक रोजगार आदी प्रचंड समस्या जाणवत असून या मतदार संघात अनेक प्रभागात बकालपणा वाढीस लागला असून विविध प्रचंड समस्याची निर्माण झाल्या आहेत त्या समस्याची सोडवणूक न होता नागरिकांना फक्त वारंवार हेलपाटे मरावे लागत असल्याने,   नागरिकांनामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. यावर अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रभागातील समस्या सोडवून घेण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळ देत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड स्वरूपात नाराजी व्यक्त केली जातं आहे.

दरम्यान राज्यात शिवसेना पक्षाच्या  विभागणी नंतर अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना साथ  दिली असली, तरी या भागात उद्धव ठाकरे पक्षाला तरुण लोकप्रिय नेतृत्व आवश्यक होते. रवी लांडगे यांच्या रूपाने आज येथे सक्षम  लढवू व तरुण ने्तृत्व मिळाले आहे. त्यामुळे  शिवसैनिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला आहे. रवी लांडगे यांच्या पक्ष प्रवेशामुळे हि  उणीव भरून निघाल्याची शिवसैनिक भावना व्यक्त करीत आहेत त्यामुळे या मतदार संघातील शिवसैनिकांना योग्य नेतृत्व मिळाल्याने  शिवसैनिकांमध्ये देखील नवचैतन्य संचारले असल्याचे जाणवत आहे.

 भोसरी मतदात संघात भाजपा सह महायुतीतील अनेक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर तीव्र स्वरूपाचे मतभेद आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधी बाबत सध्या महायुतीतील कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत असून  रवी लांडगे यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपा सह महायुतीतील कार्यकर्त्यांना एक नवीन मार्ग मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर आणखी कार्यकर्ते  रवि लांडगे यांच्या सोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाणार असल्याची चर्चा सर्व मतदार संघात सुरु आहे.  रवी लांडगे यांच्या पक्ष प्रवेशाने आगामी काळात भोसरी विधानसभेत महायुतीला फार  मोठा धोका पत्करावा लागेल असे जाणकारांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version