शैक्षणिक
प्राचार्या श्रीमती “मेरिफ्लोरा डिसोजा” यांना आदर्श प्राचार्या पुरस्कार जाहीर: सर्व स्थरावरून अभिनंदनाचा वर्षाव
घोडेगाव दि (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल च्या प्राचार्या श्रीमती मेरिपलोरा डीसोजा यांना राष्टीय पातळीवरील “इंडियन टॅलेंट ओलंपियाड” या संस्थेकडून आदर्श प्राचार्या या पुरस्काराने सन्माणीत करण्यात येणार आहे.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आयोजित करणारी राष्ट्रीय पातळीवरील *इंडियन टॅलेंट ओलंपियाड* या संस्थेमार्फत घोडेगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा यांना आदर्श प्राचार्या पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन कारण्यात येत आहे.
घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल ची इमारत
त्याचप्रमाणे विद्यालयातील गुणवत्ता पूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग, सहशालेय उपक्रमांमध्ये अग्रेसर काम , इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल,विविध क्षेत्रांमध्ये विद्यालयाची उत्कृष्ट कामगिरी, क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य इ. मुळे घोडेगावचे विद्यालय संपूर्ण नावारूपाला आले आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा यांचे आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी त्या नेहमी कार्यरत असतात. विद्यालयाचा ऑनलाइन सर्वे करून इंडियन टॅलेंट ओलंपियाड या संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला आहे. सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये किमतीची भेटवस्तू अशा पद्धतीने हा पुरस्कार विक्रोळी, मुंबई इथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान श्रीमती डिसोजा त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदण होता सून आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष संजय आर्वीकर, कार्याध्यक सुरेश काळे, संस्थेचे संस्थेचे सचिव विश्वासराव काळे, सहसचिव प्रशांत काळे, खजिनदार सोमनाथ भाऊ काळे, समन्वय समितीचे चेअरमन श्री. राजेश काळे, वसतीगृह कमिटीचे चेअरमन श्री. सूर्यकांत गांधी, विद्यालयाचे चेअरमन बाळासाहेब काळे,बी.डी.काळे महाविद्यालयाचे चेअरमन मुकुंद काळे,संचालक अजित काळे, संचालक अक्षय काळे, यांनी प्राचार्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी,पर्यवेक्षिका सौ. वंदना वायकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी देखील प्राचार्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
📯 You have a message № 592. Read > https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=6a0fb5747d6496e18d869cfc5621fe1e& 📯
November 20, 2024 at 12:49 am
0a5sso