क्रीडा
घोडेगाव “न्यू इंग्लिश स्कूल च्या” विद्यार्थ्यांनीं तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत मिळविले नेत्र दीपक यश: ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव…!!!
मंचर दि (प्रतिनिधी) येथे क्रीडा संचालणालायावतीने आयोजित तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये घोडेगाव (ता आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.त्यामुळे ग्रामस्थांकडून भरघोस कौतुकाचा वर्षाव केला जातं आहे.
क्रीडा संचालनालय पुणे यांच्यामार्फत शासकीय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याचं मंचर येथील तालुका क्रीडा संकुल, येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कामगिरी करून नेत्रदीपक यश प्राप्त केले. यामध्ये आपल्या विद्यालयाच्या एकूण ५ विद्यार्थ्यांची जिल्हा पातळी वरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान पुढील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन नेत्र दीपक कामगिरी केली ते पुढील प्रमाणे मुले (१४ वर्षे) गट- कु.विवेक मनोज घोलप(52kg) प्रथम क्रमांक.मुली (14 वर्षे) गट- कु.कस्तुरी मिडगुळे (39kg) द्वितीय क्रमांक.-कु.स्वरा राजीव झोडगे (36kg),द्वितीय क्रमांक.- मुले (१७ वर्षे )गट -ध्रुव काळे (51kg) प्रथम क्रमांक.आदित्य बेल्हवरे (71kg)प्रथम क्रमांक.-आयुध कर्पे (80kg),प्रथम क्रमांक.- मुली (17 वर्ष)गट- गौरी पोखरकर (61kg)प्रथम क्रमांक.
दरम्यान विजयी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. रोहित तळेकर व सौ ज्योती रोकडे मॅडम यांचे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी व संचालक, विद्यालयाचे चेअरमन, तसेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा दिल्या.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
August 28, 2024 at 7:18 am
सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक मनसे अभिनंदन !🌹🌹