राजकीय

जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याची चूक आगामी निवडणुकीत “भोसरी विधानसभेत भाजपाला भोवणार”?

Published

on

पुणे दि. (नेहे पाटील ) पिंपरी चिंचवड परिसरात  कमळ फुलाविण्यासाठी लांडगे कुटुंबाने आपलें आयुष्य वेचले त्याच कुटुंबाला डावलल्याची चूक भारतीय जनता पक्षाला भोसरी विधानसभेत भोगावी लागणार असल्याची दिसत आहे. भोसरी मतदार संघातून रवी लांडगे यांच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील प्रवेशाने  महाविकास आघाडीला पोषक असे वातावरण तयार होत असल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे.

दरम्यान महाविकास अघाडी मध्ये भोसरी विधानसभा मतदार संघात एक सक्षम चेहरा मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यातच सध्याच्या विद्यमान प्रतिनिधी मात्र या मतदार संघातील मोशी,चऱ्होली, दिघी, आदी भागातील निर्माण नागरी समस्यां सोडविण्यामध्ये यशस्वी न ठरल्याने मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सुरु ऐकावयास मिळत आहे. भोसरी मतदार संघातील जनतेला पाणी पुरवठा,कचारा विल्हेवाट, वाढती गुन्हेगारी, रोजगार आदी दिलेली अनेक आश्वासने गेल्या दहा वर्षात येथील विद्यमान आमदार पूर्ण करू न शकल्याने जनतेत सर्वत्र असंतोष दिसत आहे.  आगामी विधानसभेसाठी  महायुतीचे उमेदवार म्हणून  विद्यमान आमदार उमेदवार आसणार हे मात्र नक्की आहे. ते या नाराजीवर कशी मात करणार हा प्रश्नच आहे.

  त्याचप्रमाणे भाजपाच्या स्थानिक पातळीवर राजकारण्यांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यावर वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी भा ज पा ला राम ठोकत शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे भोसरी विधानसभेतील सर्व शिवसैनिकांमध्ये (उ बा ठा ) उत्साह असून संपूर्ण महाविकास आघादीच्या कार्यकर्त्यांमध्ये  नव चैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे

  सत्ताधारी विद्यमान आमदानां शह देण्यासाठी रवी लांडगे यांच्या रूपाने महाविकास आघाडीला सक्षम चेहरा मिळाल्याने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसत आहे.  दरम्यान हि निवडणूक चांगलीच काटेकी टक्कर होणार असून यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण दिसत आहे.

1 Comment

  1. Yuvaraj patil

    September 1, 2024 at 8:34 am

    Jay shivray
    Amadar ravi bhau landge

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version