राजकीय
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” श्रावण सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र “भीमाशंकर” येथे दर्शनासाठी येणार
मंचर दि. (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी (उद्या दि २रोजी) श्रावण मासानिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्रशिवज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याची माहिती शिवसेना राज्य कार्यकारणी सदस्य सचिन बांगर यांनी दिली.
श्रावण सोमवार निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता ते हेलिकॉप्टर द्वारे ठाणे येथून भीमाशंकर येथे येणार आहेत. श्री.क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगावर अभिषेक करून ते पुन्हा हेलिकॉप्टर ने ठाणे येथे जाणार असल्याचे बांगर यांनी सांगितले ते पुढे म्हणाले कि,मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील यांनी श्री.क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देऊन हेलिपॅड, दर्शन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था यांची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत
यावेळी शिवसेना आंबेगाव तालुका संघटक अशोकराव मोढवे, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रविण कोकणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व भीमाशंकर मंदिर देवस्थान विश्वस्त उपस्थित होते.