राजकीय

“राज्यात सर्वत्र सुख संमृद्धी नांदू दे”… यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिवलिंगा चरणी केली प्रार्थना….!!!

Published

on

घोडेगाव दि. (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी  श्री.क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे, व राज्यात सुख संमृद्धी नांदु दे……अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

 श्रावण मासा निमित्ताने प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासमवेत बारा शिवज्योतिर्लिंगापैकी सहावे तीर्थक्षेत्र असलेल्या डाकिन्या भीमाशंकम शिवलिंगाची मनोभावे अभिषेक पूजा केली यावेळी त्यांच्यासमवेत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, म्हाडाचे अध्यक्ष मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मा.आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना शिरूर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विकास रेपाळे, ठाणे महानगरपालिका स्थायी समितीचे मा.सभापती राम रेपाळे युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर उपस्थित होते. 

   "शिवसैनिकांचा उत्साह द्विगुणित"

दरम्यान उपस्थित शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माजी आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यानंतर आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, शिवसेना पुणे जिल्हा परिषद मा.गटनेते देविदास दरेकर, शिवसेना तालुका संघटक अशोक मोढवे, वासुदेव भालेराव, कल्याण हिंगे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे, प्रविण कोकणे, सरपंच रविंद्र वळसे पाटील यांनी त्यांचे स्वागत करुण सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version