सामाजिक
“मी म्हणजे जनसेवक, इतर सर्व लाभार्थी,”हीच भूमिका बाळगणारे तर खरे “स्वार्थी”
मंचर दि. (प्रतिनिधी)जोपर्यंत स्वतःला लाभाची पदे उपभोगास मिळतात, तो पर्यंत आम्ही “एकनिष्ठ समाजसेवक”, पण आपलें पद दुसऱ्यांकडे मिळाले, तो दुसरा मात्र लाभार्थी असा एक जावई शोध लावणाऱ्या अशा काही अल्प संतुष्ट् लोकांना “आद्य लाभार्थी” म्हणावे लागेल. व अशा “आद्य लाभार्थी” स्वयंघोषित कथाकथित पुढऱ्यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे तालुक्यातील वित्तीय संस्थासह , जनतेचे सामाजिक सौख्य अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“विधायतेतून मोक्ष मिळतो, तर स्वार्थातून कापाळ मोक्ष” शेवटी तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार…..अ-कारणपणे (काहीशा स्वार्थी भूमिकेतून) काही “आद्य लाभार्थी”कडून सुरु केलेल्या असुयेच्या राजकारणाने आंबेगाव तालुक्यातील सुसंस्कृतपणावर मलिनता येऊ लागली आहे.असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तालुक्याचे काहीही होवो माझा स्वार्थ साध्य झालाच पाहिजे अशीच काहीशी वृत्ती तालुक्यातील या “आद्यलाभार्थी” मुळे बळावू लागल्याचे दिसून येत आहे. यात कोण चूक कोण बरोबर यात जाणे हिताचे नाही पण तालुक्यात सुरु असलेली मतभिन्नता आता मनःभेदापर्यंत येऊन पोहचली आहे. मतभेद संपविता येतात पण मनःभेद मात्र हृदयावर जणू, पाषाणावर (दगडावर)छन्नी हातोडीने कोरलेल्या खुणा निर्माण करून जातात. व यातून निर्माण होणारी “असुया” अग्नीप्रमाणे हृदयातील होमकुंडात कायम प्रज्वलीत राहते . तोच अहंकारचा अग्नी इतरां अगोदर स्वतः चे सर्वस्व संपवून टाकू शकतो याचा अंदाज या “आद्य लाभार्थी” ना समजला तर सर्वांनाच्याच हिताचे होईल. यात शंका नाही.
एके काळी राजकारणामुळे एकमेकांचे तोंड न पाहाणारे दोन मित्र आता एकमेकांसाठी मैत्रीच्या अनाभका घेत आहेत, तर कालपर्यंत आपल्या गुरुसमान नेत्याचे प्रत्येक कार्यक्रमात नाव घेतल्याशिवाय क्षणहि वाया जाऊ न देणारा कार्यकर्ता,आज मात्र गुरुच्या विरोधात बेफाम बोलत आहे. हि समाज हिताची विधायक वैचारीक लढाई नसून फक्त वर्चस्व व स्वार्थासाठीची लढाई कुणासाठी आहे यात शंका नसून यातून नक्की कोणते विधायक कार्य होईल कि कुणाचा फायदा होईल याकडे तालुक्यातील जनतेने लक्ष देणे गरजेचे आहे.
लाभार्थी नक्क्की कोणाला म्हणणार?
सध्या तालुक्यात लाभार्थी कार्यकर्ते हा “शब्द”सर्वत्र विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सातात्याने उच्चाराला जातो. परंतु लाभार्थी या शब्दाचा उच्चार करणारे आजचे विरोधकच काही काळापूर्वी तालुक्यातील अनेक नावाजलेल्या संस्थावर विविध उच्च पदे भोगत, सत्तेचा माज करत होते. तेच एकेकाळ स्वतःला निष्ठावंत म्हणणारे आजचे विरोधक म्हणजेच अगोदरचे लाभार्थीच होते. हेच ते आद्य लाभार्थी आता आपल्या नेत्याला नावे ठेवत त्यांच्या घराचे वासे मोजत आहेत मग खरे गद्दार कोण हाही एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. हे आजचे विरोधक असलेल्या या “आद्य लाभार्थीची” भूमिका म्हणजे . म्हणतात ना… “सौ चुहे खाके बिल्ली चली हज को” अशीच काहीशी स्थिती आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
काल पर्यंत नेत्यांची मर्जी सांभाळून पदे उपभोगताना आम्ही एकनिष्ठ आहोत असे सांगणारे सध्याचे विरोधक(आद्य लाभार्थी) मात्र पदावरून पाय उतार झाल्यानंतर ते पद इतरांना मिळाल्यावर, दुसरा व्यक्ती मात्र लगेच “लाभार्थी” असल्याची बोंबाबोंब करत नागरिकांनातून सहानुभूती मिळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो परंतु या आद्य लाभर्थिंच्या बदलत्या हवामाना प्रमाणे मारल्या जाणाऱ्या माकडउड्यां पाहुन मात्र जनतेचे मनोरंजनच होत आहे. यात शंका नाही.
तालुक्यातील संस्था उभ्या करण्यासाठी अनेकांना घाम गाळावा लागला रक्ताचे पाणी करावे लागले. त्यामुळे तालुक्यात अनेक युवकांना रोजगार प्राप्त झाला म्हणातात ना.. ” मोडणे सोपे पण,जोडणे मात्र अवघड” मग तालुक्यात नावारूपाला आलेल्या संस्थांवर जाहीर वक्तव्य करून त्यांची गच्छंती करण्यापेक्षा आपण त्या संस्थेमध्ये संचालक अथवा पदाधिकारी असताना त्याविषयी संचालक मंडळासमोर विरोध दाखवून समाज हिताचे काम करणे म्हणजे समाज कार्य होईल कि ते जाहीर सभांमधून विरोधी वक्तव्य करून हे समजणे आवश्यक आहे. सत्तेतून राजकारण व राजकारणांतून सत्ता मिळविण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या असुयेपोटी होणाऱ्या आरोपांमुळे नावलौकिक पावलेल्या संस्थाच्या मुळावर घाव घालून त्या संस्थाचा पाया निकामी करू नये, कारण याच संस्थामध्ये काम करीत असलेले कामगार याच तालुक्यातील काही तरुण असून ते आपली स्वतःच्या बौद्धिक शौक्षणिक कार्यक्षमता सिद्ध करून प्रामाणिकपणे काम करीत आहेत.मग हेही तुम्हाला लाभार्थी वाटतात का?
तालुक्यात अनेक संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील शेकडो गरजवंत कुटुंबं आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्या तरुणांना आपलें विरोधक म्हणत त्यांना लाभार्थी अशी उपामा देणे विरोधकांना कितपत योग्य वाटते याचा विचार होणे गरजेचे आहे.काही कथाकथित पुढऱ्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे संस्थांच्या अस्तित्वाला धक्का बसला तर तालुक्याती जनता या काथकथित पुढऱ्यांना कधीच माफ करणार नाही.त्यामुळे तालुक्याच्या मुळावर जाणारे राजकारण करण्यापेक्षा विधायक काम करून पुढील पिढी सक्षम करण्यासाठी राजकारण होणे अपेक्षित आहे.
Sudhir kale
September 7, 2024 at 2:20 pm
Very nice. Keep it up
Good wishes.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 7, 2024 at 2:34 pm
लेखकांनी मांडलेले मत शंभर टक्के खरं आहे . परंतु लाभार्थी किंवा आद्य लाभार्थी हा जो काही प्रकार चालू आहे .ही एकमेकांची विरोधक मानण्यापेक्षा या दोन्ही टोळ्या एकाच घरातले आहेत आणि ह्या टोळ्या एकमेकांना संपवण्यासाठी जे काही राजकारण करत आहेत त्याचा आंबेगाव तालुक्याच्या जनतेला वीट आलेला असून आंबेगाव तालुक्यातील जनतेने उद्या दोन्ही टोळ्यांना बाजूला सारून जर तिसरा पर्याय जर निवडला तर आश्चर्य वाटायला नको एवढंच तालुक्यातील जनतेच्या वतीने मला सांगूशी वाटतं .
प्रशांत
September 7, 2024 at 8:21 pm
एक पुरुष घर पाहतो वय झाले कि तो एक ना एक दिवस घरी बसतोच म्हणजे कुटुंब थांबत नाही पुढची पिढी मुले ते कुटुंब डगमगत का होईना सांभाळतात पुढे घेऊन जातातच बंद नाय पडू देत