राजकीय

“सवंग लोकप्रियतेसाठी” खोट्या आफवांचे “भुंगिरे” सोडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न -बाळासाहेब बेंडे यांची “देवदत्त निकम ” यांचे नाव न घेता टिका…

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) सवंग लोकप्रियतेसाठी खोट्या अफवाचे भुंगिरे सोडून सर्व सामान्य शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातं आहे अशी टिका भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांचे नाव न घेता टिका केली.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणा त पार पडली यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठशाह, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कारखाना आवारात झालेल्या  गोंधळानंतर माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या आरोपांना उत्तर देताना कारखाण्याचे  अध्यक्ष बाळासाहेब बेंडे  म्हणाले कि, सध्या काही लोक सवंग लोकप्रियतेसाठी चांगल्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याच्या अगोदर पासूनचे अनेक  मोठे साखर कारखाणे कार्यरत आहेत परंतु त्यातील  काही कारखाण्यांची आर्थिक स्थिती हि,एफ आर पी देण्याची सुद्धा नाही. परंतु योग्य नियोजन व शिस्तबद्धकामामुळे आपण बत्तीसशे रुपये भाव शेतकऱ्यांना  देऊ शकलो आहे.

 जुन्नर तालुक्यात असणाऱ्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांपेक्षा जास्त भाव मिळावा अशी अपेक्षा नेहमीच आपलें  शेतकरी करीत होते व आपणही या कारखान्यापेक्षा जास्त भाव दरवर्षी आपल्या  शेतकऱ्यांना दिला आहे. २०१५-१६ नंतर आपण कधीही मागे वळून पाहिले नाही तर सतत कारखाना नफ्यात राहिला आहे.  गेल्या दहा वर्षात १८६ कोटी रुपयांची जास्तीची  रक्कम,शेजारच्या विघ्नहर कारखान्यापेक्षा, भीमाशंकर कारखाण्याने शेतकऱ्यांना  दिली आहे. कारखाण्याने जाहीर केलेल्या भावांनंतर शेतकरी संघटनेने आणखी भाव वाढवून मिळावा म्हणून मागणी केली. त्यावेळी त्यांच्या मागणी नुसार नफातोटा पत्रक व बॅलन्सशीट पत्रक आपण त्यांना देऊन राजुशेट्टी यांना सर्व माहिती दिली व कारखान्याच्या नफयातून कशा प्रकारे भाव दिला हेही सांगितले आहे. 

    “शेतकरी सभासदत्वासाठी  कायद्याची लढाई सुरु

कारखाण्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे शेतकरी शेअर्स च्या विषयी बोलताना पुढे म्हणाले कि,२००७-०८ साली चाळीस गावातील शेतकऱ्यांना शेअर्स देण्याचा ठराव करून तो साखर आयुक्ताकडे पाठविण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावाला घोडगंगा सह साखर करखाना, संत तुकाराम सह साखर कारखाना व विघ्नहर सह साखर कारखाना यांनी विरोध केला असून .जुन्नर तालुक्यातील  विघ्नहर कारखान्याने उच्च न्यायालयात जाऊन या शेतकरी शेअर्स देण्याच्या ठरावाविरोधात दावा दाखल केला आहे.या बाबत कायदेशीर लढाई सुरु आहे. परंतु काही लोकांचा  फक्त खोट्या अफवा पसरविण्याचा प्रयत्न सुरु आहे असे सांगत देवदत्त निकम यांचा समाचार घेतला

दरम्यान पुढे बोलताना बेंडे म्हणाले कि,काही लोक सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सोमेश्वर कारखाना किंवा माळेगाव कारखाण्या प्रमाणे  जास्त भाव देण्याची मागणी करत आहेत. परंतु  ते कारखाने खूप आगोदरचे असून त्या  कारखाण्याच साखर उत्पादन व्यतिरिक्त इतर काही सहाय्यक उत्पन्नाचे प्रजेक्ट सुरु आहेत. त्यानुसार आज आपल्या कारखाण्याची नफ्याची सरांसरी तेव्हढी नाही परंतु नाजिकच्या काळात नफा वाढविण्यासाठी प्रयत्न असून यासाठी, यावर्षी पासून इथेनॉल प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला असून नजीकच्या काळात  अशाच प्रकारचे अतिरिक्त उत्पन्नाचे प्रकल्प सुरु करण्याचा मानस ठेवून कारखाना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नवीन सहाय्यक उत्पनाचे स्रोत उभारून जास्त भाव देण्याचा माणस असल्याचे त्यांनी सांगितले. व  सद्य स्थितीला उसाला  रु.३५oo/-भाव देऊन कारखाना कर्ज बाजारी करायचा का? असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

दरम्यान विरोधकांवर टिका करताना अध्यक्ष बेंडे म्हणाले कि, काही लोक भुंगिरे सोडायचे काम करतात. वळवाच्या पावासानंतर भुंगिरे तयार होतात. असे काही भुंगिरे सोडणायाचे काम सध्या तालुक्यात  सुरु आहे. पावसानंतर तयार झालेले भुंगिरे पकडले नाहीत तर या भुंगीऱ्यांची उन्नी होते व ती उन्नी पिकाचे प्रचंड नुकसान करते असाच काही लोकांचा कारखाण्याच्या  प्रगतीत खो घालण्याचा डाव असल्याने ते अफवाचे भुंगिरे सोडत आहेत. 

 

 

2 Comments

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 8, 2024 at 4:13 am

    तुम्ही नेते मंडळी काहीही सांगत असला तरी सुद्धा शेतकरी सभासदांना सर्व काही कळतं तुम्ही लोकांना येडे समजतात पण लोक तुम्हाला येडे करतील तेव्हा तुम्हाला कळेल.

  2. Sanjay Babanrao Bombe

    September 9, 2024 at 7:47 am

    तूम्ही सर्वसाधारणसभेत शेतकऱ्यांना बोलू देत नसाल तर तुमची लायकी समजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version