राजकीय
“जनसेवक संजय थोरात” यांचे माध्यमातून लोककल्याणकारी योजणांचे शिबीर मंचरमध्ये उत्साहात संपन्न….!!!
मंचर दि (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील गरीब जनतेला शासनाच्या विविध योजनाचा फायदा मिळावा या उद्धेशने भाजप नेते जनसेवक संजय जिजाबा थोरात व मंचर शहर पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठे लोक कल्याणकारी शिबीर संपन्न झाले.
सर्व सामान्य लोकांच्या उत्कर्षासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबाविण्यात येणाऱ्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहीत सर्वसामान्य जनतेला मिळावी व त्यांचा गरजवंताना फायदा मिळावा या उद्देशाने मंचर शहरामध्ये (दि ९रोजी ) लोककल्याणकारी योजनेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेचा फायदा झाला तसेच आयुष्यमान भारत कार्ड,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत भरून देण्यात आले.
दरम्यान या शिबिरामध्ये २०६ सुकन्या समृद्धी खाते, २२ पीपीएफ खाते,१५५ आयपीपीबी खाते,२७२ पीओएसबी खाते,१६६ अपघाती विमा,३७८ आयपीपीबी जमा व्यवहार,२५ आयपीपीबी पेमेंट व्यवहार, ४४ बाल आधार आणि लिंक इत्यादी सेवा नागरिकांना शिबिराच्या माध्यमातून देण्यात आले.
या शिबिराचे प्रमुख पाहुणे डॉ.रामशेठ गावडे यांनी आपलें मनोगत व्यक्त करताना संगितले कि,पुणे जिल्ह्यात सर्वात मोठे हे शिबिर आज संपन्न झाले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांची संख्या पाहून खऱ्या अर्थाने जनतेचा जनसेवक म्हणून संजय थोरात यांच्याकडे पाहिलं जातं ते आज सत्यात उतरलेल दिसत आहे.या गर्दीच्या माध्यमातून दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जर कोण प्रामाणिकपणे करत असेल तर ते संजय थोरात आहेत . भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे जनकल्याणकारी योजनेचे कार्यालय त्यांच्या माध्यमातून मंचर शहरांमध्ये चालू आहे. लोकांना मोफत सर्व योजना पोहोचवण्याचं काम ते प्रमाणिकपणे करत आहेत. व आजच्या शिबिराचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
-:जनतेची सेवा हेच माझे खरे कर्तव्य:-
जनसेवक संजय थोरात म्हणाले की, मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं माझे उद्दिष्ट नेहमीच राहिले आहे. यापुढेही अशीच समाजपयोगी कामे मी सातत्याने करत राहील लोकांची सेवा करणे. व त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळवून देणे यामध्येच मला नेहमी आनंद मिळत असतो. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश ढेकळे सर,आरोग्य सहाय्यक सिद्धेश्वर गुंजकर सर,पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गणेश सांडभोर,बाबाजी हजारे,भाजप ज्येष्ठनेते भानुदास (नाना,) काळे,रवींद्र काका त्रिवेदी,विनायक धुमाळ,प्रमिला निराळे,स्नेहल चासकर,गितल गावडे,गणेश थोरात,कालिदास गांजाळे,सुरेश अभंग,भरत काळे,योगेश बोऱ्हाडे,विकास बाणखेले,संतोष थोरात,प्रवीण फुटाणे,सुभाष मावकर,महेश भोर,अंकुश थोरात,फुलाजी काळे तसेच मंचर शहरातील आशा वर्कर,अंगणवाडी सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 10, 2024 at 3:05 am
जास्तीत जास्त समाजकार्य आपल्या हातून घडो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना असेच काम आपण इथून पुढेही कायमस्वरूपी करीत राहो हेच आपणास शुभेच्छा
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 10, 2024 at 6:04 am
संजय थोरात हे खरोखर चांगले काम करतात . त्यांना पुढील कार्यासाठी मनसे शुभेच्छा !