राजकीय

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते “रवी लांडगे” यांच्या नेतृत्वाखाली, भोसरी येथे “बैलगाडा शर्यती” उत्साहात संपन्न….. 

Published

on

पुणे दि. (नेहे पाटील ) “झाली…… सेकंद बारा…. हाण गड्या घोडी हाण, घोडी हाण”,  म्हणत भोसरीच्या घाटात शिवसेना ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड चे  नेते रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित  बैलगाडा शर्यतीना सर्वस्थरातून  प्रचंड प्रतिसाद मिळाला उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाचा आवडता खेळ म्हणजे “बैलगाडा शर्यती” या शर्यतिसाठी अगदी तहान भूक विसरून बळीराजा मोठ्या उत्साहाने घाटात आपली उपस्थिती दर्शवितो याच बैल गाडा शर्यतीचे आयोजन भोसरी येथे मोठ्या जल्लोषात पार पडले.

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2024/09/1000110920.mp4

भोसरी येथील राजकीय क्षेत्रात व सर्वासामान्य जनतेच्या मनात पिढ्यानंपिढ्या स्थान असलेले कै. अंकुश लांडगे याचे राजकीय वारसदार रवीभाऊ लांडगे यांच्या सहकार्याने भोसरी  येथील धार्मिक उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते या  शर्यतिसाठी उत्तर  पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर आंबेगाव शिरूर मावळ आदी भागातील बैलगाडा शौकीकानी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

दरम्यान वर्षानुवर्षे आपल्या गोठ्यातील पाळीव जाणावरांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करणाऱ्या बळीराजासाठी बैलगाडा उत्सव हि आनंदाची पार्वणीच असते. आपल्या हातातील सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या गोठ्यातील “सर्जा राजा” ला  घेऊन बैलागाडा शर्यतीच्या घाटात आपली चमक दाखविण्यासाठी शेकडो संख्येने  शेतकरी आपलें बैलगाडे घेऊन भोसरीच्या बैलगाडा घाटात उपस्थित होते. तर हजारोच्या संख्येने  बैलगाडा शौकीनांनी घाटात उपस्थिती लावून “भोसरीचा फिक्स आमदार रवी भाऊ होणार”अशा घोषणा देत असमंत दाणानून सोडला होता.

 आगामी विधानसभेच्या पाश्वभूमीवर रवी लांडगे यांनी भाजपा ला सोडचिठठी देऊन वेगळा पर्याय निवडल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आगामी विधान सभेसाठी रवी लांडगे याची बाजू दिवसेंदिवस  बळकट होत आहे.  रवी लांडगे यांचा या परिसरातील  सर्वसामान्य मतदारांशीअसलेला संपर्क व त्यातून आपुलकीची  नाळ सर्व मतदारांशी आहे अनेक वर्ष त्यांचे कुटुंब समाजसेवे साठी अविरत कार्यरत असून  तळागाळातील कार्यकर्त्याला मदतीचा हात देऊन अनेक कुटुंबं लांडगे यांनी उभी केली आहेत. त्यामुळे या आयोजित केलेल्या बैलागाडा शर्यतीच्या माध्यमातून या  परिसरातील शेतकरी, कष्ठकरी, मतदा्रांचे हृदयात  रवी लांडगे हे स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version