राजकीय
“डिंभे धरणाचे” पाणी मिळविण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार,आंबेगावच्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी स्थानिक संस्थावर करीत आहेत का? “बेछुट आरोप”
मंचर दि. (प्रतिनिधी) सर्वत्र सद्याचे राजकारण इतक्या कुटीलपणाच्या टोकावर जात आहे कि, “स्वार्थासाठी,जातीपाती, भाऊबंदकी,पंथ, समाज्याचे नावाखाली तेड” निर्माण करून स्व-स्वार्थापोटी राजकारणी मंडळी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात हे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राने पाहिले आहे. आता तर राजकारणाची पातळी इतकी खाली उतरली कि, कोणत्याही गोष्टीची खातर जमा न करता राजकीय पुढारी बे- जबाबदार पणे आरोप करून कुटील दर्जाचे राजकारण करीत असल्याचे दिसत आहे.
राज्याचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे नावाने आंबेगाव तालुक्यात शरद सहकारी बँकेची मुहूर्त मेढ माजी आमदार कै. दत्तात्रय गोविंद वळसे पाटील रोवली. सर्वसामान्य समाज्यातील तरुण उद्योजकांना व्यवसायासाठी मदत व्हावी. तसेच गोर गरीब जनतेचा पैसा सुरक्षित रहावा या प्रगल्भ विचारातून या बँकेची स्थापना झाली. आज अनेक वर्षानंतर बँकेचा वटवृक्ष झाला आहे. व या माध्यमातून शेकडो नव तरुण उद्योजक कर्ज रूपाने भांडवल घेऊन व्यवसायाच्या क्षितिजावर यशस्वी आहेत. सामान्य गरीब कष्टकरी समाज्याने घाम गाळून कमवलेली आयुष्याची जमा पुंजी मोठ्या विश्वासाने बँकेत ठेवली आहे.
गेल्या काही महिन्यात कर्जत जामखेडच्या आमदारांना डिंभे धरणाचे पाणी पाळविण्यात आंबेगावाच्या विद्यमान आमदारांकडून विरोध होत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी आंबेगाव तालुक्यातील बँका कारखाना पतसंस्था यांना बदनाम करून स्थानिक नेतृत्वाबद्दल आंबेगावातील जनतेच्या मनात विष कालविण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे दिसत आहे. यातील एक कारण सध्या सोशलमीडियावर पहावायास मिळत आहे ते असे कि,
“संगमनेर” येथील एका मराठी उद्योजकाने आपल्या व्यवसायासाठी काही काही वर्षापूर्वी शरद बँकेतून कर्ज घेतले आहे. परंतु घेतलेल्या कर्जच्या रक्कमेची काहीच परत फेड होत नसल्याने बँकेकडून रक्कमेच्या वसुलीसाठी कारवाई करण्यात आली आहे.समजते म्हणजेच याबाबत वस्तुस्थितीची पहाणी न करता कर्जत जामखेड चे विद्यमान आमदारांना मात्र सर्वसामान्य मराठी जनतेने बँकेत ठेवी रूपाने ठेवलेल्या पैशाची काळजी वाटण्यापेक्षा त्या कर्ज न भरणाऱ्या मराठी उद्योजकाची फारच काळजी वाटली असल्याचे दिसत आहे.
दरम्यान या विषयी कर्जत जामखेड चे विद्यमान आमदार सोशल मीडियावर काही मजकूर टाकत असे म्हणतात कि,”मराठी_माणूस त्याच्या कष्टाने व्यवसाय उभा करतो. पण त्याची प्रगती बघून त्याच क्षेत्रातील मोठा उद्योजक त्याच्या अखत्यारीतील संस्थेच्या आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून मराठी माणसाचा उद्योग हडप करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे फार चुकीचे आहे. #मधुबन_डेअरी प्रकरणात #शरद_सहकारी_बँक (मंचर) कडून अशाच प्रकारची कारवाई होत असल्याचं निदर्शनास आलं असून हे अतिशय गंभीर प्रकरण आहे.
बँक प्रशासनाला विनंती आहे राजकीय दबावापोटी मराठी उद्योजकाचे नुकसान करू नये, अन्यथा या प्रकरणात कायदेशीर कारवाई करावी लागेल. तसेच या प्रकरणात राजकीय दबाव टाकणाऱ्यांनी लोभीपणाचा किती कळस गाठावा, याबाबतही आत्मचिंतन करावं.
जामखेड चे आमदार हे विसरतात कि, कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. कर्ज म्हणून दिलेला पैसा मराठी गोरगरीब जनतेचाच आहे. त्यामुळे अशा प्रकारे तालुक्यातील संस्थाना लक्ष करण्यामागे यांचा काय? हेतू आहे व या उद्योजकाविषयी हे पुतना मावशीचे प्रेम का? येत आहे.
दरम्यान या आमदारांना डिंभे धरणाचे पाणी त्यांच्या मतदार संघात न्यायचे होते. आंबेगावच्या हक्काचे पाणी इतरांना देऊन आपला तालुका दुष्काळी होऊ देणार नाही. या भूमिकेवर राज्याचे सहकारमंत्री यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे आंबेगावचे आमदार यांस मुख्य अडसर आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विषयी स्थानिक जनतेत विष कालविण्याचा हा कुटील राजकारणाचा डाव असून आगामी काळात जर आपल्या तालावर नाचणारा व आपल्या होकारात होकार करणारा “रबरी शिक्का” आमदार आंबेगावातून विजयी करण्याचे मुंगेरीलालचे स्वप्न त्यांना बहुदा दिवसांढवळ्या पडत असावे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तालुक्यातील जनतेत स्थानिक नेतृत्वाविषयी दुही निर्माण करण्याचा कुटील डाव आखाला जातं असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे