सामाजिक

आंबेगाव तालुक्यात “भोकरवस्ती” येथील बालगणेश मित्र मंडळ आयोजित “पौराणिक जिवंत देखावा” पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी….

Published

on

वळती दि.(विलास भोर यांजकडून)आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या भोकरवस्ती(वळती) येथील “बालगणेश मित्र मंडळाने” साकरलेला जिवंत चलीत पौराणिक देखावा “इंद्रायणी थांबली” पहाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर प्रचंड  गर्दी होत आहे.

राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. धार्मिक,पौराणिक, सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात असलेल्या वळती गावानजिकच्या भोकरवस्ती येथील  “बाल गणेश मंडळाने” आपली ४० वर्षांची अनोखी परंपरा जोपासत जिवंत देखवा सादर केला. असून सर्व वस्तीतील लोक एकत्र येऊन गणेशोत्सव पारंपारीक पद्धतीने साजरा करतात. व देखव्यात भूमिका हि बाजावतात. यावर्षी  संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित “इंद्रायणी थांबली” हा जिवंत देखावा प्रदर्शित करण्यात आला आहे.

 सर्व जीव जीवात्मे एकच असून त्या परब्रम्हचे अंश असून हे “ब्रम्ह” सर्व चरचारात सजीव निर्जीवामध्ये सर्वत्र ते वास करीत आहे त्यामुळे आपण  सर्वच त्या “परब्रम्ह परमात्म्याचे” अंश आहोत. सर्वांच्या हृद्यात एकच “ब्रम्ह” वास करीत असून हा उच्च तो नीच या भावनेतून बाहेर येऊन सर्वत्र “साक्षीभावाने” पाहिले तर हे सर्व ब्रम्ह मीच आहे. “अहं ब्रम्हास्मि” हा अनुभव प्रत्ययास येईल.

फार पूर्वी पासून समाजामध्ये असलेली जातीपातीची जोखाडे दूर करून समानतेचा संदेश देण्याचे काम संतांनी केले आहे. हाच  मानवतेचा संदेश सर्वत्र पोहचविण्याचे कार्य या बाल गणेश मित्र मंडळाने या गणेशोत्सवाच्या माध्यमातून केले आहे. तसेच  मंडळाकडून दहा दिवस येणाऱ्या  भाविकांसाठी दहा दिवस महाअन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आला आहे.श्री बालगणेश मित्र मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात असून श्री गणपतींची मिरवणूक पारंपरिक वाद्याने शांततेत काढली जात असते.

यावर्षी देखील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली,  दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा  हालता चालता जिवंत देखाव्यासोबत हातात गदा, सुदर्शनचक्र व  शंख हि विविध अयुधे परिधान केलेल्या “श्री विष्णू स्वरूप”  बाप्पांची मूर्ती  विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच मंडळाचे वतीने  गणेशोत्सकाळात  विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version