सामाजिक

खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

Published

on

भोसरी दि. (नेहे पाटील ) खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५१ रक्तदात्यांनी समाजसेवेचा वसा जपत, रक्तदान केले.

“रक्तदान” म्हणजे जीवनदान” आपल्या शरीरात असलेले रक्त, दान करून कोण्या गरजू पीडिताचे जीवन वाचविण्यासाठी मदत होणे म्हणजे त्या रक्त दात्याचे भाग्यच म्हणावे लागेल. रक्तदाणासाठी कारण काहीही असो परंतु “रक्त दान” हे अतिशय पवित्र दान आहे. हा समाज सेवेचा वसा जपत भोसरी परिसरातील शरद पवार  पक्षातील कार्यकर्त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भोसरी येथील इंद्रायणी नगर परिसरातील माजी नगर सेवक संजय वाबळे यांच्या कार्यालयात आयोजित केले होते. या प्रसंगी मा नगरसेवक अजित गव्हाणे, पिंपरी  चिंचवड शहर युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष इमरान शेख, व्यापारी सेलचे अध्यक्ष  विजय पिरंगुटे व  नागरिक उपस्थित होते

 या वेळी रक्तदान करणाऱ्या रक्त दात्याचा पाच लाखा रु चा   विमा काढण्यात आला असून रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या कुटूंबातील सर्व सदस्यांसाठी  एक वर्ष मोफत रक्त देण्यात येणार आहे. रक्तदान केलेल्या व्यक्तीस दहा वर्षां पर्यंत मोफत रक्त मिळण्याची सुविधा दिली जाणार असल्याची माहिती मा नगरसेवक संजय शेठ वाबळे यांनी दिली  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version