सामाजिक
“गोवर्धन प्रकल्पाच्या” उत्कर्षांसाठी अहोरात्र झगडणारा प्रगल्भ व्यवस्थापक “संजय मिश्रा”
मंचर दि (वार्ताहर)- पैशासाठी नोकरी करणारे अनेक असतात. परंतु नोकरीच्या मध्यमातून प्रामाणिक पणे काम करताना आपल्या संस्थेच्या उत्कर्षासाठी कोणत्याही बिकट स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र झगडणारा प्रगल्भ व्यवस्थापक “संजय मिश्रा” होय.
पराग पतसंस्था कर्मचारी संजय मिश्रा यांचा सत्कार करताना
दूधक्षेत्रात अनेक वर्ष काम करून गोवर्धन उद्योग समूहाला प्रत्येक क्षणी प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी कर्मचारी प्रशासन यांचा समतोल ठेवत उत्कृष्ट दर्जाच्या दर्जेदार दुग्ध उत्पादनांची निर्मिती करून योग्य नियोजन करून मागणी प्रमाणे पुरवठा करण्याचे महत्वाचे कार्य करत गोवर्धन दूध प्रकल्पच्या मानोरा उभा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणारे गोवर्धन प्रकल्पचे संजय मिस्रा यांचे कार्य अतुलनीय म्हणावे लागेल.
दरम्यान साधारण पणे १९९१ मध्ये सुरु झालेल्या या उद्योगाच्या उभारणी नंतर चार ते पाच वर्षानी संजय मिश्रा यांनी मंचर येथील प्लॅन्ट ची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर अनेक वादळे आली गेली. अनेक वेळा दूध मिळणे कठीण झाले.अशा स्थितीत उत्कृष्ट दर्जाचे दूध वेळप्रसंगी राज्यबाहेर जाऊन ते आणून बाजार पेठेतील गोवर्धन दुग्धजन्य पदार्थांची बाजारतील मागणी पूर्ण करीत कंपनीच्या प्रगतीसाठी अहोरात्र योगदान दिले.यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…..
Bapusaheb Dattu Shinde
September 24, 2024 at 12:55 pm
Very well manegment
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 24, 2024 at 5:21 pm
वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा !