राजकीय
“पूर्वापार” सुरु असलेल्या वळसे घराण्याच्या राजकारणाचे तिसऱ्या पिढीतील “पूर्वा” यांचे माध्यमातून “नवीन ध्यासाने,नवे पर्व” सुरु होणार का?
मंचर दि (प्रतिनिधी ) पूर्वापार राजकारणाच्या क्षितिजावार असणाऱ्या वळसे घरण्याच्या तिसऱ्या पिढीच्या “पुर्वां “यांचे माध्यमातून नवीन ध्यासाने “नारी सक्षमी करणाचे नवे “पर्व” सुरु होणार? खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय धडे घेणाऱ्या युवा नेत्या पूर्वा वळसे गावोगावी जाऊन आंबेगाव शिरूर तालुक्यातील मतदारांसोबत संवाद साधात असल्याचे दिसत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या राजकारणात वळसे घराण्याचे वर्चस्व पूर्वापार सुरु असून या घरण्याची तिसरी पिढी राजकारणात समाविष्ठ होत आहे.असे सांगितले जाते कि, राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे वडील माजी आमदार कै.दत्तात्रय वळसे पाटील हे तात्कालीन राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे जवळचे सहकारी त्याकाळात शरद पवारांना तालुक्यातून साथ देणाऱ्या खंदे समर्थकामध्ये माजी आमदार कै. दत्तात्रय वळसे पाटील होत व यांच्या खांदयाला खांदा लावून काम करणारे माजी आमदार बी डी काळे, विठ्ठलराव चिखले,हरी नारायण भोर,प्रकाशशेठ शाह, कानडे मुरलीधर, म्हातारबा जाधव, बाबुराव ढोबळे, बाबुराव थिटे, , बाबुराव बांगर, बाबुराव शेटे, विठ्ठलराव बाणखेले, रामभाऊ थोरात, माधवराव धुमाल, सावंत पाटील, महादू दामू भोर, गोपाळराव बारवे,हागवणे पाटील दत्तू(आबा)काळे, गेनबाबा काळे सूर्यकांत शाह, बी.डी. काळे, सतू हरी मंडलिक, रामकृष्ण बोऱ्हाडे, इंदाराम राक्षे, गाडेकर गुरुजी केंगले गुरुजी आदी मंडळींचा तालुक्याच्या जडण घडणीत मोलाचा वाटा होता.
दरम्यान माजी खासदार किसनराव बाणखेले यांनी तीन वेळा विधानसभेत प्रवेश केला या काळात एकदा कै.दत्तात्रय वळसे पाटलांचा किसनराव बाणखेले यांचेकडून पराभव झाला होता त्यावेळी दत्तात्रय वळसे यांनी आभार सभेत पुन्हा विजयी झाल्याशिवाय टोपी घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली असल्याचे जुन्या पिढीच्या नागरिकांकडून सांगितले जाते. त्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये नियोजन करीत १९८९च्या निवडणुकीत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधान सभेत बाजी मारत राज्याच्या राजकारणात प्रवेश केला त्यानंतर आजातागायात त्यांनी प्रत्येक वेळी विधानसभेच्या रणसंग्रामात विरोधी पक्षातील उमेदवाराला धूळ चारली व आपला आंबेगावाचा किल्ला अभेदय ठेवला आहे.
दरम्यान तब्बल पस्तीस वर्षानंतर तालुक्याच्या राजकारणात वळसे घराण्याचा नवीन चेहरा पूर्वा यांच्या रूपाने पुढील नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आगामी विधान सभा निवडणुकीत “नाईलाजास्तव” दिलीप वळसे पाटील निवडणूक लढाणार असल्याचे सांगितले जातं असले तरी, नवीन चेहरा म्हणून साहेबांची सुकन्या राष्टीय ग्रामीण संस्था संचालिका व आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या “पूर्वा ” यांच्यारूपाने तालुक्याच्या राजकारणात नवीन नेतृत्व समाविष्ट होऊन “पूर्वा” यांच्या नवीन राजकीय पर्वाची राजकीय सुरुवात पुन्हा “नाईलाजास्तव” म्हणत होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
आंबेगाव तालुक्यात महिला मतदान मोठ्या प्रमाणावर असून वळसे पाटील पूर्वा यांच्या रूपाने महिला उमेदवार देऊन स्त्री शक्तीला प्राधान्य दिले जाणार का? I आगामी काळात महिला वर्गाला केंद्रबिंदू ठेवून माहिला सक्षमिकरणाचा नारा देऊन तालुक्यातील महिलांचा विश्वास जिंकण्यात पूर्वा यशस्वी होणार का? जर यात पूर्वा यशस्वी झाल्या तर त्यांची पुढील राजकीय भावि्तव्य यशस्वी होऊ शकते व यात पूर्वा यांना हि निवडणूक सोयीची ठरवू शकते असे जाणकारांचे मत आहे.
त्याचप्रमाणे एकंदरीत पहात तालुक्याच्या विविध राजकीय सामाजिक क्षेत्रात पूर्वा यांचा असलेला सहभाग उल्लेखनीय आहे. सध्या पूर्वा या तालुक्यातील सर्व कला क्रीडा शौक्षणिक सामाजिक राजकीय कार्यक्रमात सक्रिय असून दररोज त्या गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेमध्ये वावरत नागरिकांशी संवाद साधत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करीत त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु असे असले तरी फक्त भेटीगाठीतून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील अडिअडचणी सोडवून जनतेचा विश्वास संपादन करून समान्य जनतेसोबत नाळ जुळविण्यात त्या यशस्वी होतील का? असाही प्रश्न विचारला जातं आहे.
दरम्यान आगामी विधानसभेसाठी दिलीप वळसे पाटलानी आगामी विधानसभा निवडणूक लढाविणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांनी आपल्या भाषणात “नाईलाजास्तव” या शब्दाची पुस्तिहि जोडली आहे. पुढे जाऊन नाईलाजावर योग्य इलाज शोधण्याचे त्यांनी अप्रत्यक्ष संकेतही दिले आहेत. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. संपूर्ण आंबेगाव विधानसभा मतदार संघात “पूर्वा वळसे” यांचा मतदारांशी संपर्क मोठ्या प्रमाणावर सुरु असून सर्वत्र दौरे सुरु आहेत. आंबेगाव विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीवर आयोजित कार्यक्रमामध्ये पूर्वा यांचा दौरा सुरु असून त्या मतदारा सोबत संपर्क करीत आहेत. यातून पूर्वा या संपूर्ण तालुका पिंजून काढीत नागरिकांचा विश्वास संपादन करीत आहेत. त्यांच्या सोबतीला दिलीप वळसे पाटील यांची विश्वासू टीम कार्यरत दिसत आहे.
संपूर्ण विधानसभा मतदार संघात “पूर्वा वळसे” यांच्या कार्य पद्धतीबद्दल नागरिकांनातून कमालीची उत्सुकता निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात पहिल्यांदाच पूर्वा यांच्या रूपाने नारी शक्तीला तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी प्राप्त होत असल्याने तालुक्यातील महिला वर्गाकडून त्यांना कसा पाठींबा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे सध्याची राजकीय स्थिती पहाता आगामी विधानसभा निवडणुक हि आंबेगाव विधानसभा क्षेत्रात एक आगळीवेगळी स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.एक युवा महिला नेतृत्व तालुक्याच्या राजकारणात प्रवेश करत असल्याने येणाऱ्या काळात तालुक्यातील जनता “पूर्वा वळसे” पाटलांच्या नेतृत्वास कसा? प्रतिसाद देणार व त्यासाठीच्या राजकीय गणिताची जुळवणूक वळसे पाटील कशी करणार? हे पहाणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 24, 2024 at 5:18 pm
ज्यांचे वय झाले ज्यांना शरीर साथ देत नाही अशा व्यक्तीने आता थांबलं पाहिजे असं अजितदादा पवार म्हणतात .त्यानुसार दिलीप वळसे पाटलांनी थांबलं पाहिजे .हे जनतेचे मत आहे . राहिला प्रश्न पूर्वा वळसे चा सूर्योदय होऊन कधी सूर्यास्त होईल हे जनता दाखवून देईल . आणि पूर्वा कधी पश्चिमेला पोहोचतील हे कळणारही नाही .