राजकीय

“चेहरा नवा, बदल हवा” म्हणत आंबेगावाच्या आगामी विधानसभा रिंगणात काही “पप्पू पहिलवान” देत आहेत,सहकार मंत्र्यांना आव्हान….

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) “चेहरा नवा, बदल हवा” म्हणत आंबेगावाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सहकार मंत्री यांच्या विरोधात निवडणूक लढाविण्यासाठी काही “पप्पू पहिलवान “उदयाला आले असून ते पप्पू पहिलवान तालुक्यातील महिलांच्या विविध देवस्थानच्या सहली घडवीत, स्वतः आमदार असल्याचा अविर्भाव दाखवत “हे बालिश पहिलवान “सहकार मंत्र्यांना आव्हान देत ” बायकांमध्ये बराळत” असल्याने आंबेगावकर जनतेची मोठी करमणूक होत असल्याची चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र विधान सभा निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे.तस तशी आंबेगाव तालुक्यातील राजकीय परिस्थितीत  बदल होत आहेत. विरोधी पक्षात या वेळी नको तेव्हडे उमेदवार निवडणूक लढाविण्याच्या वलग्ना करीत आहेत. यात काही कुस्तीगीर  पट्टीतले खेळाडू असले तरी काही मात्र अचानक पणे पावसाळ्यातील कुत्रीच्या छत्री प्रमाणे निर्माण झाले आहेत.

काही उमेदवार कुठेतरी शहरात काही प्रमाणात संपत्ती कामावल्यानंतर त्यांना समाजसेवेचा अचानक पुळका आलेला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे पप्पू पहिलावान तालुक्यात येऊन कोणतीही राजकीय अथवा समाजिक स्थान नसताना.काही लोकांना थोड्याफार प्रमाणात मदत केल्याच्या ग्वाही देत स्वतः ला दातृत्वाचा पुतळा समजून राज्याच्या सहकार मंत्र्यांना आव्हान देण्याच्या वलग्ना करीत आहेत.

दरम्यान तालुक्यातील जनतेला आपलेसे करण्यासाठी हे महाभाग काही महिलांच्या सहली, बैलगाडा शर्यती, साडी वाटप, भांडी वाटप इलेक्ट्रिनिक वस्तूंचे वाटप करीत अप्रत्यक्ष पणे अचारसंहिते अगोदर मतदान खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत, मला निवडणुकीत एकवेळा संधी द्या असे म्हणत मतदारांना विनंती करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

 काही ठिकाणी या पप्पू पहिलवानांच्या दातृत्वाच्या गप्पा लाभार्थी सांभासदाकडून सांगितल्या जातं आहेत. तसेच यांना विरोधी पक्षातील महाआघाडीतील अनेक कार्यकर्ते पाठींबा देत असल्याचे भासविले जातं आहे. मात्र या बाबत त्यांच्याच जवळचे काही लाभार्थी कार्यकर्ते खाजगीत चर्चा करताना म्हणत आहेत कि, जब तक गंगा बहती है| तब तक हात धोलो. नंतरचे नंतर पाहू. यावरूनच या उमेदवारांनाची पुढील स्थिती कशी असेल याचा अंदाज येत आहे.

 कोणी कितीही मोठ मोठ्या गप्पा मारत असले तरी आंबेगाव तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास हा राज्याचे सहकार मंत्री यांनीच केला असल्याचे मतदार ठासून सांगत आहेत.तालुक्यात डिंभे धरणाचे पाणी गावोगाव मिळण्यासाठी धरणाच्या निर्मिती नंतर रोजगात हमी योजनेत असलेल्या उजव्या कलव्याच्यानिर्मितीसाठी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याकाळी तातडीने निधी उपलब्ध करून दिला म्हणूनच उजव्या  या कालव्याचे काम तातडीने पूर्ण झाले व तालु्याच्या विविध गावांमधील शेती बागायती झाली. तसेच तालुक्याची जीवन वाहिनी असलेल्या घोडनदीवर मोठ्याप्रमाणावर कोल्हापुरी पद्धतीचे बांधरे बांधून त्या माध्यमातून या तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी आणले आहे. त्यामुळे येथील शेतकरी खऱ्या अर्थाने आपल्या सुपीक जमिमीचा मालक राहिला इतर तालुक्याप्रमाणे फक्त औद्योगिक करणं केले असते तर तालुक्यातील भूमिपुत्र आज मावळ मुळशी भोसरी या प्रमाणे भूमिहीन होऊन दुसऱ्याच्या कंपन्यांच्या गेट वर कामासाठी उभा राहिला असता आपल्या जमिनीची किंमत काय असते हे करोना महामारीच्या काळात अनेकांच्या लक्षात आले आहे. 

दरम्यान यातच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची भाषा करणारे पप्पू पहिलवान तालुक्यात औद्योगिकरण  करण्याच्या वार्ता करीत आहेत. परंतु यांना हेच माहित नाही कि येथील भौगोलिक व इतर काही परिस्थिती नुसार औद्योगिकरण करणे शक्य होणार नाही.

1 Comment

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 26, 2024 at 2:35 am

    मुळात आपल्या देशात लोकशाही आहे लोकशाही म्हणले की प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा लढवण्याचा अधिकार आहे .निवडणूक लागली की अचानक काहीजण उगवतात असं नाही .ते निवडणूक आल्यानंतर अचानकच लढवावे लागतील . त्यामुळे निवडणुकीत पाच वर्ष राजकारण करणं पाच ही वर्षे निवडणुकीच्या मध्ये राहणे ती शक्य नाही .उरलेले चार साडेचार वर्ष काम धंदा करून घर चालवून समाजामध्ये काम करून निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीचे राजकारण करावे . आणि राहिला विकासाचा प्रश्न तर प्रत्येक जण सत्तेत आल्यानंतर विकास करणारच आहे त्याच्यामुळे सहकार मंत्र्यांनी विकास केला विकास केला विकास केला असे जे काही बोललं जातं हे खरं जरी असलं तरी 35 वर्षे ते सत्तेत होते म्हणून ते विकास करू शकले पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांना संधी मिळाली नाही ? 35 ;35 वर्षे जर हेच करणार असेल पुढील 35 वर्षे जर परत यांची पोरगी बाळ म्हणून जर देणारे जर असेल तर इतर समाजाने इतर नेतृत्वाने करायचे काय ? बाकीच्या तालुक्यांनी तुम्ही बघा दर पाच-दहा वर्षांनी नेतृत्व बदलत जातात . बाकीचे खेड तालुका जुन्नर तालुका मावळ तालुका शिरूर तालुका तिथल्या लोकांच्या आर्थिक परिस्थिती जर बघितली तर आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या पेक्षा तिथली आर्थिक परिस्थिती अतिउत्तम आहे आणि विकासाचे काम करताना व्यवसाय पूरक आणि रोजगार निर्मिती याच्यावरती विकास झाला पाहिजे . हे मात्र निश्चित . त्यामुळे बदल हा झाला पाहिजे चेहरा हा बदलला गेला पाहिजे यात मात्र शंका नाही आणि आंबेगाव तालुक्यातील जनता या वेळेला नवीन चेहरा दिल्या शिवाय राहणार नाही . आणि बदल घडवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित !

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version