सामाजिक

ॲड.अविनाशजी रहाणे साहेब हे खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यातील “शिवसैनिकांच्या ऊर्जेचा महासागर”!!! – सचिन बांगर,राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य युवा सेना

Published

on

मंचर दि -(प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांना घडविणारे विद्यापीठ म्हणजे शिवसेनेचे मा.जिल्हाप्रमुख ॲड.अविनाशजी रहाणे साहेब होत असे भावपूर्ण उदगार शिवसेना (शिंदे गट)  युवा सेना राष्टीय कार्यकारणी सदस्य सचिन बांगर यांनी केले.

 माजी जिल्हाप्रमुख अँड.अविनाशजी रहाणे साहेब यांचे प्रथम पुण्य स्मरणदिनानिमित्ताने मंचर (ता आंबेगाव) येथे आयोजित कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील अनेक जुने निष्ठावंत  शिवसैनिक उपास्थित होते. यावेळी कला क्रीडा सामाजिक शौक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपलें मनोगत व्यक्त करताना बांगर यांनी सांगितले कि, पुणे जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी हिंदुत्ववादी विचार पोहचविण्यासाठी साहेबांनी आपले संपुर्ण आयुष्य शिवसेनेसाठी झोकुन दिले. गावोगावी शिवसेनेचे रोपटे लावले.

 आज पुणे जिल्ह्यात त्याच रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. शिवसेना ह्या चार अक्षरांना जनतेच्या ह्रदयात स्थान मिळवुन देत असताना माझ्यासह हजारो शिवसैनिक व सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन असामान्य पदापर्यंत पोहचवले. साहेब, पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला आजन्म विसरू शकत नाही. अशी श्रद्धांजली त्यांनी व्यक्त केली.

      अविनाश रहाणे साहेबांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मंचर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन रहाणे साहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

1 Comment

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 26, 2024 at 9:33 am

    ” विनम्र अभिवादन “🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version