शैक्षणिक

पुणे येथील लोककला महोत्सवात घोडेगाव “न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या” विद्यार्थ्यांची “दैदिप्यमान” कामगिरी…!!

Published

on

घोडेगाव: दि.- अखिल भारतीय बालरंगभूमी परिषद,आयोजित  पुणे येथील “जल्लोष लोककलेचा’* या स्पर्धेत घोडेगाव ता आंबेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चमदार कामगिरी करीत श्रोत्यांची मने जिंकली.

पुणे येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अखिल भारतीय बालरंगभूमी परिषद, मुंबई-शाखा पुणे आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’* या स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध लोककला सादरीकरण स्पर्धेमध्ये घोडेगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग घेतला होता. त्यामध्ये समूह गायन नृत्य व गायन स्पर्धा यांचा समावेश होता.

 या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रत्येक समूह गान नृत्य व गायन स्पर्धेत प्रत्येकी प्रथम क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांनी समूह गायन करताना संत जनाबाईंचे अभंग गायले. नृत्य प्रकारात कुमारी परिणीती शार्दुल बारवे या विद्यार्थिनीने देवीचा गोंधळ हे लोक नृत्य सादर केले तसेच कुमार अर्णव अमोल इंगवले याने शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली. 

या स्पर्धेत विद्यालयाचे एकूण २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: पोर्णिमा मंगेश मंडलिक, रिया मंगेश घोलप मनस्वी प्रदीप करपे, शुभ्रा एकनाथ काळे, आस्था दिनेश पिंगळे, आराध्या दत्तात्रय सांडभोर, स्वरा दिपक बारवे, सृजा दत्तात्रय गेंगजे, दूर्वा अरविंद काळे, स्वरा संतोष लोहोट, काव्या चारुदत्त तारू आदेश जालिंदर जगदाळे, आराध्य मारुती राक्षे, विवेक सचिन भागवत, प्रज्वल ज्ञानेश्वर कुसाळकर, शौर्य गणेश घोलप, रणवीर राहुल बेल्हवरे, मयुरेश धनंजय नांगरे, साईराज गणेश काळे, पृथ्वीराज जितेंद्र खोसे. अर्णव अमोल इंगवले. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री. गंगाराम तनपुरे सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांना विद्यालयाच्या शिक्षिका सौ. संगीता करपे, श्री. सुरज काळोखे व श्री. संदीप आमोंडकर, संगीत व कला क्षेत्रातील विद्यालयाच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक संगीत विशारद श्री. गंगाराम तनपुरे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2024/09/1000146158.mp4

 दरम्यान आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे उपाध्यक्ष संजय आर्वीकर कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे संस्थेचे सचिव विश्वासराव काळे, संस्थेचे खजिनदार सोमनाथ भाऊ काळे, समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, वसतिगृह कमिटीचे चेअरमन . सूर्यकांत गांधी, विद्यालयाचे चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक अक्षय काळे व अजित काळे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका वंदना वायकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version