महाराष्ट्र
मंचर येथे “दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिराचे” आयोजन
मंचर दि. (राजेश चासकर ) येथे तहसील आंबेगाव व मंचर नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिर चे आयोजन केले होते.
नगर पंचायत येथील (शुक्रवार दि २७रोजी) आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिराचे यावेळी अस्थिव्यंग- ११,अंध – २ आणि कर्णबधिर-२ असे एकूण- १५ दिव्यांग बांधव उपस्थित होते. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना सोबत घेऊन दिव्यांग मतदार जनजागृती रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंचर नगरपंचायत पर्यंत काढण्यात आली.
दरम्यान दिव्यांग मतदार जनजागृती शिबिर मंचर नगरपंचायत, येथे पार पडले. यामध्ये दिव्यांग मतदारांना इ. व्ही. एम. मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी असलेल्या सुविधांबाबत व्हील चेअर,रॅम्प,अंध मतदारांसाठी इ. व्ही. एम. मशीनवर ब्रेल लिपीचे आयोजन करण्यात येईल तसेच दिव्यांगांच्या मदतीसाठी स्वयंसेवक उपलब्ध असतील असेही सांगण्यात आले . तसेच जे दिव्यांग बांधव मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी जाऊ शकत नाहीत अशा दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे. दिव्यांगांनी आपला मतदानाचा हक्क मतदान करून पार पाडावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी आंबेगाव नायब तहसीलदार – सचिन वाघ, दिव्यांग कक्ष अधिकारी शरद फड,व श्रीमती सुजाता जाधव तसेच सर्वश्री कर्मचारी हजर होते.