राजकीय

सहकार मंत्री दिलीप वळसे(पाटिल)यांचे उपस्थितित “वळती” येथे महायुतीचा सहविचार मेळावा संपन्न: मेळाव्यास महिलांची अभूतपूर्व उपस्थिती…

Published

on

वळती दि ( विलास भोर यांजकडून) महाविकास आघाडीचे आव्हान धूडकावण्यासाठी आंबेगाव तालुक्यात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सत्तेतील राष्टवादी(अजित पवार गट),शिवसेना (शिंदे गट) व भाजपा कार्यकर्त्यांना एकत्रित करून सहविचार मेळाव्याचे आयोजन करीत असून त्यांना सर्वत्र अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. 

महाराष्ट विधान सभेच्या निवडणुकीची अचार संहिता जाहिर होण्या अगोदरच आंबेगाव तालुक्यात विधानसभेच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरु झाली आहे.सर्वच  उमेदवार  मतदारांशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत. या अनुषंगाने सत्ताधारी महायुतीने सुद्धा जोरदार तयारी सुरु केलेली दिसत आहे. राज्यभरात महायुतीचे मेळावे पार पडत असताना याच धर्तीवर आंबेगाव  विधानसभा क्षेत्रात देखील निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे. त्या दृष्टीने  वळती (ता. आंबेगाव) येथे  महायुतीचा सह विचार मेळावा पार पडला.

आगामी  विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा अतिशय महत्वाचा असून या मेळाव्यातून विधानसभेचे रण धुमाळी तालुक्यात निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या सभेला संबोधित करताना राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले कि, आगामी काळात आंबेगाव विधान सभेचा महायुतीचा उमेदवार मीच असून त्या अनुषंगाने सर्वांनी तयारी करावी राज्यात पुन्हा महा युतीचे सरकार आणायचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे असे आवाहन करीत विविध  सूचना वळसे पाटलांनी सर्वच महा्युतीच्या  कार्यकर्यांना दिल्या आहेत.

 दरम्यान आंबेगाव तालुक्यात पंचायत समिती गण नुसार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून या मेळाव्यास  चांडोली बु. पंचायत समिती गणातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व  महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.या मेळाव्याप्रसंगी  भिमाशंकर साखर कारखान्याची चेअरमन बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे,कारखानेचे संचालक दादाभाऊ पोहकर व अंकित जाधव,पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, रमेश खिलारी, बारकु बेनके, वैभव उडे, उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन शरद बँकेचे संचालक शिवाजी लोढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं होते मेळाव्याचे निमित्याने चांडोली बु.पंचायत समिती गणातील महीलांवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता .

या मेळाव्यास मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या गावभेट दौऱ्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पारंपारिक वाद्यात, फटाक्यांच्या आतेषबाजी करून जेसीबीतून गुलाब पुष्पाच्या  पाकळ्याचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी लोढे यांनी केले तर सुत्रसंचलन निवेदक निलेश पडवळ व अनिल वाजे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version