गावागावातुन
मंचर शहरात बैलपोळा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा: मोरडे व लोंढे यांच्या बैलजोडीने पटकविला प्रथम क्रमांक.!!!
मंचर दि (प्रतिनिधी) येथे प्रती वर्षी प्रमाणे याही वर्षी भाद्रपद महिन्यातील बैलपोळा उत्सव पारंपारीक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला.
शेतकत्यांच्या सर्व सुख दुःखात सदैव सहभागी असणाऱ्या सर्जा राजा च्या अनंत उपकारातून उताराई होण्यासाठी शेतकरी प्रतीवर्षी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो काही ठिकाणी हा श्रावण पोळा साजरा केला जातो तर परंतु मंचर येथे भाद्रपद पोळा साजरा केला जातो या निमित्ताने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंचर निघोटवाडी शेवाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य बैलपोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात तळी भंडार करून बळीराज्याने मिठ्या आनंदाने बैलपोळा महोत्सवाला सुरुवात करण्यात केली. त्याचप्रमाणे सायंकाळी पारंपरिक वाद्याच्या गजरात डीजेच्या तालावर भंडाराची उधळण करत बैलांना आकर्षक सजवून त्यांची मिरवणूक मंचर शहरात काढण्यात आली. मंचर येथील शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातून नव्याने निवड झालेल्या बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आली
याप्रसंगी गोवर्धन उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, माजी पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले, लाला अर्बन बँकेचे चेअरमन युवराज बाणखेले,यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्ता थोरात, आंबेगाव तालुका कुंभार समाज अध्यक्ष राजू सोमवंशी,मंचर नगरपंचायतचे अधिकारी वरद थोरात, निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, शेवाळवाडीचे सरपंच निलेश थोरात,API बडगुजर, सुरेशआण्णा निघोट, बैलगाडा संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबाजी थोरात, प्रवीण मोरडे, लक्ष्मण थोरात ,बाजीराव मोरडे,जगदीश घिसे, बाबू बोऱ्हाडे, जेके थोरात , केके थोरात, इ.उपस्थित होते.
दरम्यान यावेळी आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्हे देऊन शेतकरी वर्गाचा सन्मान करण्यात आला यात शिस्तबद्ध मिरवणूक सुंदर व आकर्षक बैलजोडी चे नंबर काढण्यात आले.प्रथम क्रमांक दत्तात्रय शंकर मोरडे आणि महादू त्र्यंबक लोंढे . द्वितीय क्रमांक – संजय विठ्ठल निघोट आणि राजवीर नितीन थोरात विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंचर. तृतीय क्रमांक- ज्ञानेश्वर सोपान निघोट आणि विठ्ठल मारुती पाचपुते चतुर्थ क्रमांक – भिकाजी मोरडे आणि भानुदास बाणखेले पाचवा क्रमांक- गणेश अनंता खानदेशे आणि सिताराम मथाजी लोंढे त्यांना रोख बक्षिसे आणि भव्य ट्रॉफी देण्यात आली. प्रत्येक सहभागी बैल जोडीला उत्तेजनार्थ भव्य ट्रॉफी देण्यात आली.
बैलपोळा महोत्सवाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंचर शहर निघोटवाडी शेवाळवाडी यांनी केले तर बैलपोळ्याचे उत्तम नियोजन धर्मवीर चंद्रशेखरआण्णा बाणखेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास बाणखेले, ग्रामपंचायतचे माजी सदस्य वसंतराव बाणखेले, लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक उपाध्यक्ष गणेश खानदेशे,बैलगाडा संघटनेचे सचिव सागर पाचपुते यांनी केले.