शैक्षणिक
घोडेगाव येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्काऊट गाईड पथकाने राबवले स्वच्छता अभियान..
घोडेगाव दि (प्रतिनिधी) समाज्याला स्वच्छतेचा संदेश देण्याच्या हेतूने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त घोडेगाव येथील “आंबेगाव तालुका विद्या मंडळ” संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल च्या स्काऊट गाईड पत्रकाच्या वतीने प्रभात फेरी व ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त न्यू इंग्लिश मीडियम स्कूल च्या स्काऊट गाईड पथकाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण घोडेगाव शहरात प्रभात फेरी काढली व गावातील विविध रस्ते , बाजारपेठ,, ग्रामदैवत हरिश्चंद्र महादेव मंदिर परिसरात साफसफाई करून स्वच्छता अभियान राबवले.यासोबत शहरातील बाजारपेठांमध्ये व गावातील चौकांमध्ये इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कु. अस्मि हर्षद राऊत हिने महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी तसेच सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
दरम्यान विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव श्री विश्वासराव काळे, खजिनदार श्री सोमनाथ भाऊ काळे, समन्वय समिती चेअरमन श्री राजेश काळे, वस्तीगृह कमिटी चेअरमन श्री सूर्यकांत गांधी, संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी श्री प्रशांत बाळासाहेब काळे, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, संचालक श्री अक्षय काळे व श्री अजित काळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक श्री. संतान आसंगी, श्रीमती रूपाली काळे, विद्यार्थिनी कु. ऋतिका घोडेकर कु. गायत्री कदम यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या देशसेवेची व समाजकार्याची माहिती विद्यार्थ्यांना माहिती दिली.
याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ. वंदना वायकर , स्काऊट गाईड विभागाच्या प्रमुख सौ ज्योती रोकडे व श्रीमती तेजश्री येंधे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कु. अनुष्का वसंत लांघी हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.