सामाजिक
“शरद बँक” पुढील तीन वर्षात पाच हजार कोटीच्या उलढालीचे उद्दिष्ट गाठणार – देवेंद्र शाह
मंचर दि (प्रतिनिधी) शरद बँकेवर सभासदांचा असलेला विश्वास आणखी दृढ व्हावा यासाठी दर सहा महिन्यांनी शरद बँक आपले बॅलन्सशीट सभासदांना पाठविणार असून पुढील तीन वर्षात पाच हजार कोटीच्या उलाढालीचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शाह यांनी दिली
शरद सहकारी बँकेवर सर्व सभासदांनी जो विश्वास ठेवला आहे त्या माध्यमातून आज बँकेची उतुंग प्रगती होत असून यावर्षी बँकेने सभासदांना दहा टक्के लाभांश दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख,सर्वश्री संचालक दत्ता थोरात,सुषमा शिंदे, दौलत लोखंडे यांच्या सह विविध अधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना शाह म्हणाले कि,पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शरद बँकेने बँकिंग व्यवसायात आपलें प्रगतीचे पंख फुलवून दिमाखदार गरुड झेप घेत आहे सर्वसामान्य गरजवंत व्यक्तीला मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने एक्कावन वर्षापूर्वी शरद बँक सुरु करण्यात आली असून सुरु अनेक गरजवंत नागरिकांना बँकेने मदतीचा हात दिला आहे आंबेगाव तालुक्यात लावण्यात आलेल्या शरद बँकेच्या रोपट्याचा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष झाला आहे.
दरम्यान यावर्षी आठ्ठावीस हजार सभासदांना चारकोटी पेक्षा जास्त लाभांश दिला असून या वर्षी बँकेचा एन पी ए 3.४८ टक्के आहे तर सद्य स्थितीत बँकेचे भाग भांडवल ४८३४ लाख आहे तर एकूण निधी १९३३७.६२लाख असून खेळते भांडवल १९५६८०.५५ एव्हडे आहे. बँकेचे कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट असून बँकेच्या एकूण २७ शाखा व २५ ए टी एम कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक बँकाच्या तुलनेत शरद बँकेचा कर्जवरील व्याज दर कमी असून गृह कर्ज -८.५,सोने तारण कर्ज -8.5,वाहन तारण कर्ज -८.५ तर शौक्षणिक कर्ज – ८.७५ असून व्यवसाय कर्ज १o.५ टक्के दराने दिले जात आहे तसेच बँक कडून खातेदारास आठठेचाळीस ते बहात्तर तासात शाखा स्तरावर कर्ज उपलब्ध होते.
त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसायासाठी अण्णा साहेब पाटील महामंडळ, ओ बी सी महामंडळ, डॉ अब्दुल कलाम महामंडळ यातून कर्ज वितरण केले जातं आहे.पुढील तीन वर्षात बँकेचा व्यवसाय ५ooo कोटी च्या पुढे नेण्याचा माणस असून ५०शाखा उभारून त्यातून आपल्या भागातील सुमारे ३५o युवक व युवतीना रोजगार उत्पन्न होणार आहे.त्यासाठी पुढील योग्य नियोजन करण्यात आले आहे. तर पुढील काळात बँकेच्या पन्नास शाखा सुरु करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन काम केले जात आहे असेही शाह यांनी सांगितले.