राजकीय
विधानसभेच्या पश्वभूमीवर चाकण येथे युवासेनेच्या “युवामहाराष्ट्र दौरा” निमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न … !!
मंचर दि. (प्रतिनिधी )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या युवाशक्तीची ताकद दाखविण्यासाठी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा संपूर्ण महाराष्ट्रात “युवा महाराष्ट्र” दौरा आयोजित केला असल्याची माहिती राष्टीय युवा कार्यकारणी सदस्य सचिन बांगर यांनी दिली.
शिवसेना (शिंदे गट) चे सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर लोकसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकारी व युवासैनिक यांचा मेळावा मोहितेवाडी येथील हिंदवी गार्डन(ता.खेड,) येथे उत्साहात संपन्न झाला.
महाराष्टात सुरु झालेल्या विधानसभा निवडणुकानाच्या पाश्वभूमीवर या मिळाव्याला महत्व प्राप्त झाले असून युवासैनिकांना आगामी काळात पक्षाच्या हितासाठी जागृत राहून उदन सभेवर जास्तीत जास्त उमेदवार निवंडून आणण्यासाठी प्रयत्न करावायाचे असून या बाबतचे मार्गदर्शन या मेळाव्यात युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर व जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी केले
.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक अक्षय जाधव, युवासेना जिल्हाप्रमूख धनंजय पठारे, प्रविण थोरात पाटील, युवासेना जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, युवासेना जिल्हा समन्वयक सागर पाचर्णे, मा.उपसभापती सौ.ज्योतीताई अरगडे, युवासेना तालुकाप्रमुख विशाल पोतले, वैभव पोखरकर, विष्णु वाळके पाटील, शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण, युवतीसेना तालुका संघटक आरतीताई कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.