सामाजिक
जेष्ठ बंधु समवेत “गोवर्धन उद्योगाच्या” उत्कर्षांचे स्वप्न उरी बाळगणारा , डेअरी उद्योगातील प्रकाशमान तारा: “प्रीतम शाह
मंचर दि (प्रतिनिधी)कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तीला योग्य पाठबळ आवश्यक असते.हे बळ देणारा व्यक्ती जीवनात आली तर कोणतेही अशक्यप्राय कार्य सहज शक्य होते.आपले जेष्ठ बंधू देवेंद्रासोबत “गोवर्धन समूहाच्या” उत्कर्षाचे लक्ष, मनात बाळगून सातत्याने अहोरात्र झगडणारा सक्षम साथीदार व स्वकर्तृत्वाने उद्योगविश्वात सदैव प्रकाशमान असलेला दैदीप्यमान “तारा” अनेक युवा उद्योजकांचा स्फूर्तीस्थान “, गोवर्धन उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक “प्रीतम शाह” यांचे नाव घेतले जाते .
भारतीय दुग्ध व्यवसायात प्रगतीच्या शिखरावर सातात्याने प्रकाशमान असलेल्या गोवर्धन अर्थात पराग मिल्क फूड्स या उद्योगाचे नाव आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या पातळीवर गर्वाने घेतले जाते. गेल्या तेहतीस वर्षात अहोरात्र मेहनत घेऊन उद्योग जगतातील अनेक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अशा संकटाचा सामना करीत गोवर्धन उद्योग समूह यशस्वीतेच्या शिखरावर दिमाखात विराजमान आहे.
खरेतर सुमारे १९९२च्या सुमारास सुरु झालेल्या गोवर्धन प्रकल्पची प्रगतीची वाट सुरुवातिच्या काळात अतिशय खडतर व बिकटच होती परंतु या उद्योगाला यशस्वीतेच्या शिखरावर पोचविण्यासाठी, समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर पराग उद्योग समूहाचे चेअरमन देवेंद्र शाह यांनी मात केली परंतु त्यांच्या या प्रत्येक बिकट प्रसंगात सावली सारखे उभे राहून, प्रचंड आत्मविश्वासाने साथ देणारे त्यांचे लहान बंधू “प्रितम शाह” यांच्या कार्य कर्तृत्वाकडे हि दुर्लक्ष करता येणार नाही.
प्रभू श्रीरामांसोबत सर्व सुख दुःखात सावली सारखे साथ देणारे त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण असोत किंवा श्री कृष्णाना साथ देणारे मोठे भाऊ बलराम असोत यांचे कार्य कर्तृत्वाचा आजही सन्मान केला जातो तसाच सन्मान प्रितम शाह यांच्या कार्याचा होत राहील प्रितम हे गोवर्धच्या कोंदनातील एक अमूल्य “रत्न” होत. कारण पराग मिल्क (गोवर्धन उद्योगा)च्या सुरवातीच्या काळापासुनच या उद्योगाच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी “प्रितम शाह”यांनी प्रचंड कष्ट घेतले हे नाकारून चालणार नाही.
दरवर्षी सुमारे तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेला हा उद्योग समूह ग्राहकांच्या मनाचा कानोसा घेत नवनवीन दर्जेदार उत्पादने व्यापारी बाजार पेठेत आणत आहे.जगभरात ग्राहकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करत असलेल्या हा उद्योग समूह बाजारपेठेवर वर्चस्व मिळवत सुमारे दहा हजार कोटींचा उलाढालीचा टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष उरी बाळगून वाटचाल करीत आहे
कोणत्याही बिकट प्रसंगात आपलें थोरले बंधू देवेंद्र शाह यांच्या बरोबर पर्वाताप्रमाणे पाय रोवून उभे राहत पराग उद्योग समूहाचा गवगवा सातासामुद्रापार नेण्यामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान असून समुद्राप्रमाणे शांत, प्रामाणिक, आपल्या ध्येय पूर्तीसाठी कामात झोकून देण्याची त्यांची वृत्ती अनेक नवउद्योजकासाठी एक मार्गदर्शक दिशाच आहे.दरम्यान या गोवर्धन ऊद्योगाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झगडणाऱ्या या उद्योग विश्वातील प्रकाशमान तारा असलेले गोवर्धन उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक प्रितम शाह यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा…..