राजकीय

देवदत्त निकम यांचा  खरा चेहरा जनतेला दाखविणार -लक्ष्मण निकम 

Published

on

मंचर दि(प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांत सत्तेचा माज दाखवीत सर्वसामान्य ग्रामस्थांना दिलेल्या त्रासाची परत फेड देवदत्त निकम यांना नक्की करावी लागेल अशी जळजळीत प्रतिक्रिया आंबेगाव विधानसभा अपक्ष उमेदवार लक्ष्मण  निकम यांनी दिली 

आंबेगाव तालुक्यात विधान सभेच्या रण संग्रामात देवदत्त निकम यांना घरातूनच त्यांना मोठा विरोध होऊ लागला असल्याचे दिसत असून  निकम विरुद्ध निकम असा थेट सामना नाजिकच्या काळात पहावायास मिळणार असल्याचे दिसत आहे. महविकास आघाडीचे उमेदवार  देवदत्त निकम यांचे  जवळचर नातेवाईक नागपूर गावाचे ग्रामस्थ लक्ष्मण निकम  यांनी देवदत्त निकम यांच्या विरोधात  आपला उमेदवारी अर्ज ठेवला आहे. त्यामुळे आंबेगाव विधानसभा मतदार संघात देवदत्त निकम यांना गावातूनच  प्रखर आव्हान उभे ठाकले असल्याचे दिसत आहे. देवदत्त यांच्या विरोधात अर्ज दाखल करणारे अपक्ष उमेदवार लक्ष्मण निकम हे शेतकरी कुटुंबंतील आहेत.

दरम्यान आंबेगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार लक्ष्मण निकम यांनी देवदत्त निकम यांच्यावर टिका करताना सांगितले कि, नागपूर व इतर गावातील व  परिसरातील अनेक शेतकरी कुटुंबाला देवदत्त निकम यांनी  सत्तेच्या माध्यमातून प्रचंड त्रास दिलेला आहे.गेले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असताना सत्तेचा दुरुपयोग करीत देवदत्त निकम यांनी  सर्व सामान्य शेतकऱ्यांना प्रचंड त्रास दिलेला आहे. 

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावातील सर्वसामान्य शेतकरी व  कष्टकरी कामगार  प्रचंड दबावाखाली आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेने त्यांचा भूतकाळातील जुलूमशाहीचा इतिहास समाजावून घेतल्यास जनता कधीही देवदत्त निकम यांना मतदान करण्याचे धाडस जनता कधीच करणार नाही असे सांगाताना  लक्षण निकम पुढे म्हणाले कि येणाऱ्या पुढील काळात त्यांच्या या जुलमी कर्तृत्वाचा पर्दाफाश करून त्यांचा खरां चेहरा समाजासमोर आणणार असल्याचे त्यांनी यांनी सांगितले.

1 Comment

  1. Arjun bhor ..

    November 6, 2024 at 5:05 am

    Lakshman nikam he….valse patlanche piillu…..grampanchayat ladhavta yet nahi….chalala. Aamdarki ladhavayala…..nikam sahebanvarti tika kartana…..laykit Kara…..sagla hishob hoil….nikam sahebancha khara chehra …jantela mahit aahe….20.tarkela takhavtil…..dam dhara…..Aamdar fhakta nikam sahebach….lava takat…aami nahi vakat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version