राजकीय
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
मंचर दि (प्रतिनिधी):- शरद बँकेचे संचालक सहकार मंत्र्यांची जवळचे सहकारी जयसिंग थोरात व यशवंत दूध वाहतूक संस्थांचे संचालक निवृत्ती निकम यांचा रांजणी येथे गावभेट दौरात महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला असल्यामुळे वळसे पाटलांना हा एक धक्का उमेदवार देवदत्त निकम यांनी दिला् आहे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.तालुक्यात ठरविक नेत्यांना आपल्या तंबूत आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते दोन्हीही उमेदवार गावोगावी जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत.
रांजणी (ता आंबेगाव)गावाभेत दौऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवात देवदत्त निकम यांच्या उपस्थितीत शरद बँकेचे संचालक व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जवळचे सहकारी जयसिंग थोरात व यशवंत दूध वाहतूक संस्थांचे संचालक निवृत्ती निकम यांचा रांजणी येथे गावभेट दौरात महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे हा वळसे पाटलांना महत्वाचा धक्का समजला जातो
दरम्यान प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा ते प्रयत्न करणार असल्याची माहिती देवदत्त निकम यानी दिली ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील थोड्या दिवसात आबेगाव तालुक्यात सभा घेणार आहेत.असल्याचे हि निकम यांनी सांगितले यावेळी तालुका अध्यक्ष धोडीभाऊ भोर,किसन उंडे,चेतन वाघ,तालुका महिला अध्यक्षा पुजा वळसे व राजणी ग्रामस्थ उपस्थित होते.
“आघाडीचा उमेदवार निवडून आणणार” -जयसिंग थोरात
फुले, शाहू, आंबेडकर आणि गांधी-नेहरू यांचे विचार मांडणारे आणि सातत्याने शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता यांचे हित जोपसणारे शरद पवार साहेब या महानेत्याचा मोठा प्रभाव माझ्यावर दीर्घकाळापासून आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारापासून दूर जाऊ शकत नव्हतो नव्याने देवदत्त निकम याचे बरोबर काम करुण शरद पवारचे हात बळकट करु व तालुक्यात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडुन आणु असे विधान संचालक शरद सहकारी बँक जयसिंग थोरात यांनी यावेळी केले