राजकीय

आंबेगाव तालुक्यात मेडिकल कॉलेज उभारणार : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील 

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी ) तालुक्याच्या शौक्षणिक व आर्थिकदृष्ठ्यां  विकासासाठी नजीकच्या काळात आंबेगाव तालुक्यात मेडिकल कॉलेजची निर्मिती करणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले 

विधानसभेच्या पश्वभूमीवर मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी बोलताना वळसे पाटील पुढे म्हणाले कि, तालुक्यातील सर्वच जनतेने मला प्रचंड प्रेम दिले आहे तालुक्याचा कला क्रीडा शौक्षणिक सामाजिक आर्थिक विकास व्हावा यासाठी मी कायमच तत्पर राहिलो आहे. १९९० च्या अगोदर आंबेगाव तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून होती. या तालुक्यातील विविध गावातील अनेक कुटुंबातील माणसे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने कुटुंबापासुन दूर जातं मुंबई सारख्या शहरांमध्ये पडेल ते काम करीत होते.

दरम्यान तालुक्याचे हे चित्र पालटण्याचे ध्येय मनाशी  बाळगून आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी विविध विकासाच्या योजना  आणल्या, यात प्रामुख्याने डिंभे धरणाचे निर्मितीला गती देऊन कॅनॉलद्वारे पाणी आणल्याने  विविध गावाच्या विहिरी तालावांना  पाणी आले त्यातून शेती बागायती झाली. शेतीवर आधारीत दुग्ध व्यवसाय सुरु झाला यातून शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळू लागला. अशाच पद्धतीने नवनवीन संकल्पना राबवत विविध उद्योगाना चालना दिली. यातून कारखानादारी वाढली बँका पतसंस्थांनाचे मोठे जाळे निर्माण झाले. त्यामुळे  तालुक्यातील शेकडो कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना बँका पतसंस्था, साखर कारखाना, डेअरी उद्योग यातून रोजगार उपलब्ध झाला आहे.

तालुक्यात विविध दर्जेदार शिक्षण संस्था उभ्या राहिल्या त्यासोबत इंजिनिअरिंग कॉलेज इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या यातून सर्व सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत  शेताकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याने शेतकरी साधन झाला त्याचप्रमाणे बाजार पेठा हि  विकसित झाल्या आहेत.

दरम्यान वळसे पाटील पुढे म्हणाले कि, आंबेगाव  व शिरूर तालुक्यातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. येथील जनतेच्या प्रगतीसाठी व विकासासाठी मी सर्व आयुष्य समर्पित केले आहे.तालुक्यातील सर्व जनतेसोबत माझी नाळ जोडलेली आहे त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत तालुक्याच्या विकासासाठी मी काम करत राहणार आहे. पुढील काळात तालुक्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी काटीबद्ध असून  लवकरच तालुक्यात मेडिकल कॉलेज सुरु करणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version