राजकीय
“भोसरीतील एकाधिकारशाही मुळापासुन संपवा” येथे लोकप्रतिनिधी नाही, तर ताबा गॅंग कार्यरत – रोहित पवार
भोसरी दि (प्रतिनिधी) :- भोसरीत परिवर्तन करायचे हे नागरिकांचे ठरलेले आहे. येथे लोकप्रतिनिधी नसून ताबा गँग कार्यरत आहे. येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात चालते.अशी टिका आमदार रोहित पवार यांनी केली
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार भोसरी येथे गुरुवारी बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका सारिका लांडगे आणि संतोष लांडगे शिवसेनेचे रवी लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.
यावेळी झालेल्या सभेत रोहित पवार म्हणाले कि , भोसरी मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला जो ऑन ग्राउंड होता. सोशल मीडिया तसेच कॉलिं चा आधार घेऊन करण्यात आला होता. ज्यामध्ये अजित गव्हाणे यांचे नाव पुढे आले आहे. सुसंस्कृत उच्चशिक्षित म्हणून अजित गव्हाणे यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांची पसंती मिळत आहे.
भोसरीतील आमदारांच्या एकाधिकारशाही, आपल्याच लोकांना पुढे करत महानगरपालिकेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, ठेके मिळवण्यासाठी दबाव पद्धती याला सर्व कंटाळले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण परिवर्तनाच्या मनस्थितीत आहे.
मतदारसंघातील अडचणी लक्षात न घेता सामान्य लोकांच्या गरजा लक्षात न घेता केवळ आपल्या हिताचे पाहिले जात आहे. त्यामुळे अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून नागरिकांनी परिवर्तन करायचे ठरवले आहे. ज्याला भोसरी परिसरातील प्रत्येक घटकाची साथ मिळत आहे.
दरम्यान सामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी एक चांगला प्रतिनिधी म्हणून अजित गव्हाणे एक चांगला पर्याय आहेत. त्यांच्या पाठीमागे लोक उभे राहतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला
*शिवसेनेची साथ महत्त्वाची*
भोसरी मतदारसंघांमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाची साथ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याबद्दल सुलभा उबाळे, रवी लांडगे तसेच तमाम शिवसैनिकांचे मनापासून आभार रोहित पवार यांनी व्यक्त केले. भोसरी मतदारसंघांमध्ये प्रत्येक जण मन लावून काम करत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा विजय निश्चित आहे. असे देखील रोहित पवार म्हणाले.