राजकीय
“संघर्ष करणाराच इतिहास घडवीतो,”उद्योगधंदे व रोजगार टिकविण्यासाठी महायुतीला हद्दपार करु” – रोहित पवार
भोसरीदि. (प्रतिनिधी) गुजरातला चाललेले उद्योगधंदे वाचवू, रोजगार टिकवू महायुतीला हद्दपार करू असा कानमंत्र देत आंमदार रोहित पवार यांनी भोसरीतील तरुणांमध्ये जोश निर्माण केला.
महाराष्ट्रातील अनेक उद्योग व्यवसाय गुजरातला पाठवून येथील तरुण बेजरीजगार युवकांना बेरोजगारीच्या छायेत सत्ताधारी युती सरकारणे मोठे पाप केले आहे त्यामुळे परिवर्तन घडवून उद्योगधंदे वाचवू, रोजगार टिकवू महायुतीला हद्दपार करू असे म्हणत रोहित पवार यांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस: चिन्हासमोर बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.८) युवा नेते रोहित पवार यांनी मतदारसंघातील भोसरी, धावडे वस्ती चक्रपाणी वस्ती, त्यानंतर सायंकाळी निगडी, यमुनानगर हा भाग अक्षरशः पिंजून काढला. तरुणांना सोबत घेऊन, उद्योगधंदे वाचवू, रोजगार टिकवू महायुतीला हद्दपार करू असा कानमंत्र दिला. महायुतीचे सरकार या महाराष्ट्रात उद्योगधंदे टिकू देत नाही. उद्योगधंदे गुजरातला पळवले जातात. तळेगावात येणाऱ्या वेदांता,फॉक्सकॉन प्रकल्पाचे काय झाले हे सगळ्यांनी पाहिले. त्यामुळे आता वेळ आली आहे परिवर्तन घडवण्याची, प्रत्येक विधानसभेतील एकेक शिलेदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचल्यानंतरच आम्हा युवकांचे भविष्य ठरणार आहे असे देखील पवार यांनी सांगितले
“युवा कार्यकर्त्यांची ताकद भोसरीमध्ये इतिहास घडवणार”
अजित गव्हाणे यांनी केलेल्या परिवर्तनाच्या संघर्षाचे रोहित पवाराकडून कौतुक करण्यात आले. संघर्ष करणाराच इतिहास घडवतो हे आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शिकलो आहोत. या मतदारसंघातही आपल्याला इतिहास घडवायचा आहे.ज्यामध्ये तरुणांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सामील झालेले सम्राट फुगे, संतोष लांडगे, रवी लांडगे यांसारख्या युवा कार्यकर्त्यांची ताकद अजित गव्हाणे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे गव्हाणे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास रोहित पवार यांनी निगडीतील पदयात्रेदरम्यान व्यक्त केला.