राजकीय

आगामी काळात “दिघी” गावाचा सर्वंकष विकास करणार – अजित गव्हाणे

Published

on

भोसरी दि (प्रतिनिधी) :  दिघी गाव भोसरी विधानसभा मतदार संघात  आजही अनेक सुविधा पासून वंचित आहे यापुढे दिघीचा सर्वकष विकास करणार अशी ग्वाही अजित गव्हाणे यांनी दिली 

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 9) दिघी परिसरात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मारुती भैरवनाथ मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी माजी सरपंच साहेबराव वाळके, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, संतोष वाळके ,सुधाकर भोसले, प्रभाकर कदम, संतोष तानाजी वाळके, कृष्णाजी वाळके, ज्ञानेश्वर वाळके, ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर महादेव वाळके, मनोज परांडे ,राजेंद्र तापकीर आदी उपस्थित होते

यावेळी नागरिकांसोबत सुरु असलेल्या संवाद यात्रेत मतदारांशी संवाद साधाताना गव्हाणे पूढे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वर्षभराचे साधारण ८ हजार चारशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. यातून दिघी गावाला किती निधी मिळाला. आज दिघीमध्ये खेळाचे मैदान, जलतरण तलाव, उद्यान, कुस्तीचा आखाडा, बैलगाडा घाट अशी एकही सुविधा न पुरवणाऱ्यांना दिघीमधील नागरिकांकडून मत मागण्याचा नैतिक अधिकारच नाही असे अजित गव्हाणे सांगितले व आगामी काळात दिघीमध्ये या सर्व सुविधा पुरवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली 

. दरम्यान दिघी परिसरातील आदर्श मित्र मंडळ, नेहरू तरुण मित्र मंडळ, त्रिमूर्ती मंडळ मार्गे  मारुती भैरवनाथ मंदिर ते दिघी गावठाण कॉलनी नंबर एक ते बारा, विजयनगर, काटे वस्ती गायकवाड नगर, शिवरत्न कॉलनी, चौधरी पार्क येथील नागरिकांशी अजित गव्हाणे यांनी संवाद साधला. यावेळी अजित गव्हाणे पुढे म्हणाले आपण समोरच्यांना गेली दहा वर्ष संधी दिली. मात्र त्यांनी या संधीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला. दिघी परिसर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नंतर समाविष्ट झाला. या भागामध्ये स्वातंत्र्यसैनिक, आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या भागामध्ये संरक्षण खात्याचे अनेक उपक्रम आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांनी या परिसरात वास्तव्याला पसंती दिली. आपले वास्तव्य वाढवले. देशाची सेवा करणाऱ्या या नागरिकांना गेल्या दहा वर्षात कोणत्या सुविधा मिळाल्या का असा सवाल त्यांनी जेष्ठ नागरिकांना केला 

यापूर्वीचे हवेली आणि त्यानंतर नव्याने निर्मित झालेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघावर माजी आमदार विलास लांडे यांनी काम पाहिले. त्यांनी एका रुपयाचाही भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महापालिकेत केला  नाही. आमदारांनी आम्हा नगरसेवकांच्या कामात कधी अडथळा निर्माण केला नाही. नाहक लुडबुड केली नाही. या शहराला यशवंतराव चव्हाण, प्रा. रामकृष्ण मोरे यांचा वारसा लाभला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या शहराला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र याच शहराचे नाव मलिन करण्याचे काम गेले दहा वर्षात झालेले आहे. अशी टीका अजित गव्हाणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version