राजकीय
नेहरूनगरमधून अजित गव्हाणे यांना सर्वाधिक लीड देणार – मा महापौर हनुमंत भोसले
भोसरी दि (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीत नेहरूनगर परिसरातून महा विकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना सर्वांधिक लीड मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे माजी महापौर हनुमंत भोसले यांनी सांगितले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा या परिसरामध्ये रविवारी (दि.10) काढलेल्या प्रचार दौऱ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला. या प्रचार दौऱ्याने आत्तापर्यंतच्या सर्व गर्दीचे अक्षरशः रेकॉर्ड मोडले असून . माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरूनगर मधून सर्वाधिक “लीड” अजित गव्हाणे यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. आहे
यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर,विरोधी पक्षनेते राहुल भोसले , माजी नगरसेवक समीर मासुळकर तसेच बबन शिंदे, मधुकर भसाड, विठ्ठल भसाड, दादा राजगुडे, चंद्रकांत महाराज घोडे , माणिकराव धाडगे, सचिन जाधव, नारायण पांढरे, जयंत शिंदे, संतोष लष्करे, अनिल यादव, किशोर गवई, अशोक बनसोडे, उत्तम जोगदंड, लक्ष्मण जोगदंड,शिवा उबाळे तसेच नेहरूनगर , मासुळकर कॉलनी, अजमेरा परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. नेहरूनगर, झिरो बॉईज चौक ,संतोषी माता मंदिर रस्त्यापासून पुढे मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी पासून हा दौरा मार्गस्थ झाला. यावेळी अजित गव्हाणे यांनी गणपती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,संतोषी माता , मारुती मंदिरात दर्शन घेतले. अजित गव्हाणे यांनी विविध सोसायटी धारक ,नागरिक, व्यापारी यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत आगामी काळात त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देणार असल्याचे सांगितले.
यावेळी हनुमंत भोसले यांनी नागरिकांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले अजित गव्हाणे हे शरद पवार यांचे उमेदवार आहेत. शरद पवार यांच्या दूरदृष्टीने आपल्या शहराची प्रगती झाली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आपल्याला शरद पवारांना विजयी करायचे आहे. त्यांनी जो संघर्ष उभा केला आहे. त्या संघर्षाला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे अजित गव्हाणे हे विजयी होणे महत्त्वाचे आहे.