सामाजिक
नेमकी “गद्दारी” करणं म्हणजे काय?
पुणे दि. (प्रतिनिधी)आंबेगाव च्या इतिहासात एक अनोखी गोष्ट घडली “वळसे पाटलांना पाडा” असे जाहीर आवाहन देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी जाहीर सभेतून मतदारांना केले. खरंतर गद्दारांना पाडा असे म्हणणारे शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय किती योग्य व किती अयोग्य हा विचार मतदारांनी करावयाची वेळ आता आली आहे.
गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात आपलें स्थान आढळ ठेवणारे शरद पवार आज जाहीर पणे वळसे पाटलांना पाडा असे म्हणतं आहेत हे व्यासपीठावरून जरी योग्य वाटत असले तरी खरंच त्यांच्या या अवाहणास प्रतिसाद आंबेगावातील जनतेने दिला पाहिजे का? हाच खरां महत्वाचा विषय आहे.
कारण तालुक्यात बदल करण किंवा तोच प्रतिनिधी निवडणं हे सर्वस्वी तालुक्यातील सुजान मतदाराच्या हातात आहे. तो हक्क मतदार प्रमाणिकपणे बाजावतील यात शंका नाही. आज राज्यात साहेबाना सोडलं ही गद्दारी झाली असे भासविले जातं असले तरी काही वर्षा पूर्वी देखील राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांनी त्यावेळाचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधी भूमिका घेतली होती त्याला आपण काय? म्हणणार ती ही गद्दारीच होती ना? मग असे असताना शरद पवारांनी वळसे पाटलांना गद्दार म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होणार नाहीत का?
दरम्यान साडेतीनशे वर्षापूर्वी गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी राजे सोबत केलेली गद्दारी केलेली महाराष्ट विसरला नाही असे सांगितले जाते. तर मग काही वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाना बाबत झालेली गद्दारी तरी महाराष्ट कसा? विसरेल हेही महत्वाचे आहे. म्हणतात ना पेरलेले उगवते असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल नाही का?
आज कोणीही काहीही म्हणो परंतु १९९0अगोदर चा काळ ज्या व्यक्तींनी पाहिला त्यांनी या तालुक्यातील दुष्काळ बेरोजगारी, आर्थिक असमतोल पाहिला आहे.ते पहाता वळसे पाटलांचे योगदान तालुक्यातील जनतेने विसरणे ही सुद्धा एक गद्दारीच ठरेलं असे म्हणणे वावगे ठरणार नाही का?
तालुक्यात अनेक नेत्यांच्या सभा होत आहेत होत राहणार परंतु आपल्या तालुक्याच्या हिताचे काय? हा विचार जनतेने करायचा असतो तालुक्यात अनेक प्रश्न आहेत तालुक्यात एम आई डी सी ची गरज आहे परंतु ही एम आय डी सी सुरु झाल्यावर तालुक्यातील प्रश्न सुटणार आहेत का? आज शेजारच्या अनेक तालुक्यातील शेतकरी या मुळे गाव सोडून वरागंदा झाला आहे. हे वास्तव आहे. काही खरेदी विक्री करणारे एजंट या प्रकरणास हवा घालीत असले तरी एम आय डी सी ची आंबेगाव तालुक्यात खरच गरजेची आहे का? हा विचार होणे आवश्यक आहे.
दरम्यान शेजारी तालुक्याचे प्रश्न पहाता आंबेगाव तालुका खूप संपन्न आहे. असे सर्वांना जाणावेल परंतु शेवटी मतदार हा राजा आहे. त्याला त्यांचा मतदाणाचा हक्क आहे. व त्याने तो बजावला पाहिजे. परंतु, तो पूर्ण विचार करून….. कारण मतदानानंतर पुढील पाच वर्ष हात चोळण्याशिवाय मतदार राजाच्या हातात काहीच राहणार नाही हे नक्की, त्यामुळे विचार करा व मतदान करा…म्हणतात ना…. एकदा तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही तसेंच एकदा केलेले मतदान पुन्हा पाच वर्षे तरी सुधारता येणार नाही म्हणूनच मतदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे विचारपूर्वक करणे आवश्यक आहे
Nilkanth Suresh Kale
November 13, 2024 at 5:18 pm
👌👌👌👌👌
Vikram Pandharinath Kale
November 13, 2024 at 6:55 pm
आंबेगाव ची सुज्ञ जनता ही विकास पुरुष नामदार दिलीपराव वळसे पाटीलचे मागे उभी आहे
⏰⏰
अशोक मोढवे
November 14, 2024 at 12:28 am
योग्य विचार मांडलेत आंबेगाव तालुक्यातील जनता सुज्ञान आहे या ठिकाणी दिलीपराव वळसे पाटीलच निवडून येणार
Arvind Ramesh Ghodekar
November 14, 2024 at 1:30 am
अगदी बरोबर आहे एमआयडीसी ची तशी तालुक्याला गरज काय काही ठराविक लोक यासाठी आग्रही आहेत पण आंबेगाव शिरूर ची जनता सुज्ञ आहे तालुक्याचा विकास काय झाला आहे हे 1990 पासून पाहिलेली मांडली या तालुक्यात अजून आहेत
Suyog
November 14, 2024 at 3:12 am
खुप छान विश्लेषण केलयं आपणं … पण तरी सुद्धा आंबेगाव ची जनता जर भावनिक होवुन मतदान करणार असेल तर त्यांच्या एवढे दुर्दैवी कोणचं नसतील
Yash nandkar
November 14, 2024 at 8:37 am
100% सहमत