राजकीय
“महापालिका शाळांचा दर्जा सुधारत,: शिक्षण संस्था सुदृढ व अद्यावत करणार” -अजित गव्हाणे
भोसरी दि (प्रतिनिधी) बालवयापासूनच चिमुकल्यांना सक्षम करण्यासाठी आगामी काळात महापलिकाच्या शाळांचा दर्जा सुधारविण्यासाठी व शिक्षण पद्धती अद्यावत सुदृढ करण्यासाठी काम करणार असे आश्वासन अजित गव्हाणे यांनी दिले.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बालाजी नगर इंद्रायणी नगर तसेच आसपासच्या परिसरामध्ये प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अजित गव्हाणे यांनी गुरुवारी इंद्रायणी नगर परिसरातील समर्थ कॉलनी, सिद्धिविनायक नगरी, आनंदसागर, कृष्णा हेरिटेज, संजीवनी कॉलनी द्वारका विश्व, राजेश्वर सोसायटी, केंद्रीय विहार, महाराष्ट्र चौक, गंगा निकेतन सोसायटी, स्पाइन मॉल, सेक्टर नंबर 9, सेक्टर नंबर 11 या भागांमध्ये अजित गव्हाणे यांनी गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी नगरसेवक संजय वाबळे, रवी लांडगे, सारिका लांडगे, विक्रांत लांडे, शिवसेना संघटक तुषार सहाने, विजयकुमार पिरंगुटे, माणिकराव जैद, चंद्रकांत नाणेकर, आकाश कंद सहभागी झाले होते. यांच्या समवेत अनेक आजी-माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
“बाल दिनांनिमित्ताने लहानग्या चिमुकल्या सोबत खेळताना, अजित गव्हाणे देहाभान विसरून हरपून गेल्याचे पाहावयास मिळाले. संत तुकाराम यांनी सांगितल्या प्रमाणे “देव पहावयास गेलो व देवची होऊन गेलो” असेच काहीसे अजित गव्हाणे लहान मुलांमध्ये हरपल्याचे दिसले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे गुरुवारी इंद्रायणीनगर परिसरात चिमुकल्यांमध्ये रमले. गुरुवारी प्रचाराच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत असताना काही चिमुकल्यांनी अजित गव्हाणे यांचे लक्ष वेधले. यावेळी मुलांशी गप्पा मारत त्यांनी निरागस बालकांच्या सोबत वेळ दिला यावेळी त्या बालकांच्या पालकांसोबत चर्चा करताना “आगामी काळात महापालिका शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच येथील शिक्षण संस्था अद्यावत करण्यावर भर देणार” असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.
दरम्यान पुढे बोलताना उमेदवार अजित गव्हाणे पुढे म्हणाले कि,इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरामधील शांतता आणि सलोखा या महत्त्वाचा मुद्द्यावर येथील नागरिक एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. माजी पदाधिकाऱ्यांनी या भागातून परिवर्तन घडवण्याचा निश्चय केला आहे. या भागांमध्ये सुनियोजित व्यवस्थापन, शांतता प्रस्थापित विविध विकासाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील.