शैक्षणिक

मंचरच्या “निकिता कुदळे” ची राष्ट्रीय नेटबॉल संघात निवड…!!!  

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी): – येथील रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज  ची विद्यार्थिनीं निकिता कुदळे पुणे येथे झालेल्या विभागीय नेटबॉल स्पर्धेत नेत्रदीपक असे यश संपादन केले.

दरम्यान या स्पर्धा 9  ऑक्टोबर 2024 रोजी  पार पडल्या. यात 14 वर्षे व 17 वर्ष वयोगटातील मुलींनी यामध्ये बाजी मारली. विभागीय स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच 17 वर्षे वयोगटाखालील मुलींमध्ये कु. निकिता लक्ष्मण कुदळे हिची भंडारा येथे 8 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या  राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये निवड झाली असून निकिता ची लुधियाना (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या महाराष्ट्र संघात देखील वर्णी लागली आहे.

त्यामुळे सर्व यशस्वी खेळाडूंचे प्राचार्य उत्तम आवारी यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्याध्यापिका सुरेखा भांगरे,पर्यवेक्षक यादव चासकर,दिलीप चौधरी,अंजली वाळुंज, प्रमोल पवार उपस्थित होते.यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक दत्तात्रेय चासकर नितीन शिरोळे यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, बाबाजीशेठ टेमगिरे , जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामकांत निघोट, सर्वश्री ग्रामपंचायात सदस्य व ग्रामस्थांचे वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version