राजकीय

“मंचरच्या जाहीर सभेत शरद पवार यांनी, वळसे पाटलांविषयी केलेल्या  वक्तव्याचा खरा अर्थ “काय? आंबेगाव मध्ये चर्चेला उधान….

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) येथील जाहीर सभेत शरद पवार यांनीवळसे पाटला विषयी केलेल्या  वक्तव्याचा खरां अर्थ काय?… पराभूत करा.. करा… करा… म्हणजेच विजयी करा.. करा.. करा.. हा तर नाहीना? कारण थोरले पवार दरवेळी जी भूमिका मांडतात नेमकं त्याच्या विरुद्ध करतात…आंबेगावात चर्चेला उधान…..

देशाच्या राजकारणात नावाजलेलं नाव म्हणजे शरद पवार… अनेक राजकारणी त्यांच्या विषयी बोलताना त्यांचा सन्मान करतातच परंतु सन्मानांसोबत मोठ्या पवारांविषयी एक  आदरयुक्त भीतीहि सुद्धा दाटलेली दिसते असे म्हटलं जाते कि मोठे पवार एखादी गोष्ट बोलले कि ते नेमकं त्याच्या विरुद्ध भूमिका घेतात म्हणजेच एखादी गोष्ट करा म्हणून सांगितले तर ती गोष्ट करू नका असा त्याचा अर्थ निघतो. किंवा घ्यायचा असतो.

सध्या महाराष्ट विधान सभा निवडणुकीत शरद पवारांच्या अनेक ठिकाणी सभा झाल्या परंतु त्यांची एक सभा प्रचंड गाजली ती म्हणजे आंबेगाव तालुक्यातील पवारांचे माणसं पुत्र समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार  पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम प्राचारार्थ झालेली सभा होय. यासभेत शरद पवार यांनी वळसे पाटलांचा  पराभव करा… करा…. करा… असे म्हटले आहे.

दरम्यान या पवारांच्या सभे नंतर मात्र गेल्या दोन तीन दिवासानंतर आंबेगाव तालुक्यात मात्र वेगळाच सुरु ऐकावायास मिळत आहे. तो म्हणजे शरद पवार यांनी वळसे पाटलाविषयीं घेतलेली भूमिका शब्दात जरी पाराभूत करा होती तरी त्याचा सरळ अर्थ उलटा घ्यावायाचा आहे म्हणजेच त्यांच्या मते वळसे पाटलांना विजयी करा… करा… करा… असा होतो असे अनेकांचे म्हणणे असून याबाबत  आंबेगाव विधानसभा भागात प्रचंड तर्क वितर्क सुरु असून पवार साहेब जे पाहिजे असतें नेमकं त्याच्या विरुद्ध बोलतात.  त्यातच खासदार सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील यांनी देखील आपल्या सभातून वळसे पाटलांवर विशेष टिका टिपण्णी केली नाही असेहि बोलले जाते

त्यामुळे वळसे पाटलांच्या समारोप सभेस मंचर येथे प्रचंड गर्दी झाली होती व आंबेगाव विधान सभेस जोडलेल्या बेचाळीस गावातून हि मोठ्या प्रमाणावर मतदारांनी हजेरी लावली होती असे सांगितले जातं आहे. तर आंबेगाव तालुका तसेच शिरूर तालुक्यातील ४२ गावातील अनेक जुन्या जाणत्या नागरिकांनातून वळसे पाटलाना विजयी करा असा संदेश मोठ्या पवारांनी दिला असल्याची चर्चा सुरु आहे.

1 Comment

  1. Suraj Hinge patil

    November 19, 2024 at 4:48 am

    जस सुप्रियाताईना विजयी करा म्हंटले पवार साहेब आणि आम्ही सुनेत्रा ताई भरघोस मताने विजयी झालेल्या पाहिल्या… असाच होतो तुमच्या बातमीचा अर्थ…

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version