सामाजिक
“निकम “यांच्या निकटवर्तीयाला बेकायदा दारू वाहतूक करताना पोलिसांनी पकडले: तालुक्यात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त
शिंगवे दि. (प्रतिनिधी)आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या वाहणावर कारवाई केली असून आरोपी सह मुद्देमाल ताव्यात घेतला आहे
विधानसभा मतदानाच्या पुर्व संधेला रात्री दहाच्या समारास आंबेगाव तालुक्यातील संस्कृतीचे धिंदोडे निघू लागल्याची घटना घडली असून तालुक्याच्या पूर्व भागात शिंगवे गावात बेकायदा दारू वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली असून वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
आंबेगाव तालुक्याची सुसंस्कृत ओळख निवडणुकीच्या निमित्ताने पुसली जाते कि काय? असा प्रश्न उभा राहू लागला आहे सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मतदानाचे पूर्वसंधेला तालुक्याच्या सुसंस्कृत पणाचे धिंदोडे निघणारी घटना घडली असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या शिंगावे या परिसरामध्ये एका कार क्रमांक -MH14CK7659 या सफेद रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या स्वीफ्ट डिझायर कार मधून विनापरवाना दारू नेली जातं असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित वाहन चालक दत्तात्रय गेनभाऊ गाढवे यांना ताब्यात घेतले असून ते सेवानिरुत्त अधिकारी असल्याचे सांगितले जाते
तालुक्यात पहिल्यांदाच निवडणुकीच्या निमित्ताने मदयाचा महापूर आला असल्याची चर्चा असून संबंधित आरोपी हे आंबेगाव विधान सभेचे उमेदवार निकम यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जातं आहे.