शैक्षणिक
“मा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ” यांचा स्मृतीदिन मंचर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात साजरा…
मंचर दि (प्रतिनिधी):-:रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज च्या प्रांगणात महाराष्ट्राचे राज्याचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री व देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी माजी मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण यांचा स्मुर्तीदिनांनिमित्त आजोजीत कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक यादव चासकर व शिक्षक उपस्थित होते.यावेळी माईझा तिरंदाज,आदित्य पांचाळ, सलोनी बांबळे,सृष्टी कोरडे, शिवम घुले या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. राजकारणातील व समाजकारणातील अतिशय सुसंस्कृत व दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व अशा शब्दात यशवंतरावांचा उल्लेख उत्तम आवारी यांनी आपल्या भाषणातून केला. यशवंतरावाचा कृष्णकाठ हा आत्मचरित्रपर ग्रंथ सर्व विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे व त्यांची प्रेरणा घेऊन जीवनामध्ये यशस्वी झाले पाहिजे असा सल्लाही यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अश्विनी चव्हाण हिने सूत्रसंचालन केले. पौर्णिमा सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन आश्रफ पठाण, दिलीप चौधरी सुवर्ण शिंगाडे,कल्याणी बांगर, दत्तात्रेय चासकर, मारुती बोराडे यांनी केले.