अध्यात्मिक

खरोशी येथे “श्री दत्त मूर्ती” प्राणप्रतिष्ठापणा  व भव्यदिव्य  मंदिर कलशरोहन सोहळा 

Published

on

राजगुरूनगर दि. (प्रतिनिधी) दिगंबरा…. दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या शुभप्रसंगी  श्री दत्त जयंतीचे निमित्ताने खरोशी (ता. खेड) येथे श्री दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व भव्य मंदिर कलशारोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

खेड तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत श्री क्षेत्र भीमाशंकर च्या परिसरात असलेल्या खरोशी या गावामध्ये भव्य दत्त मंदिर उभारण्यात आले असून (दि १३ व १४ रोजी) या मंदिराचा कलशरोहन सोहळा संपन्न होत आहे.

याप्रसंगी शुक्रवारी(दि १३रोजी) सकाळी गणेश पूजन पुण्यहावाचन मातृका पूजन,वास्तूपीठ क्षेत्रदेव  पूजन, पिठस्थ देवातांची स्थापना,अग्नी स्थापना, नवगृह स्थापना, होईल त्यानंतर श्री दत्त मूर्ती व कलश यांची पारंपारीक पद्धतीने ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक होईल. त्याचप्रमाणे श्रीच्या मूर्तीचा अभिषेक त्यानंतर मूर्ती व कलश धान्य निवास होऊन महाप्रसाद होऊन रात्री कालभैरवनाथ भजन मंडळ धामणगाव यांचा संगीत भजन कार्यक्रम होईल.

दरम्यान शनिवारी ( दि १४रोजी) सकाळी पिठस्थ देवतांची पूजा व उत्तरांग हवन त्यानंतर कलश व श्री मूर्ती दशविधी स्नान,त्यानंतर ब्रम्हचैतन्य श्री प्रभुनाथ महाराज यांचे शिष्य श्री संजय माऊली (कोल्हापूर) यांचे हस्ते कलश व मूर्ती पूजन होऊन त्यानंतर कलशरोहन व श्री दत्त मूर्ती स्थापना होऊन पूर्णआहुती आरती होईल. त्यानंतर दुपारी श्री जगदाळे महाराज यांचे श्री दत्त जन्म कथेवर प्रवचन होऊन त्यानंतर दत्तजन्म सोहळा होईल त्यानंतर हारतुरे,संगीत भजन होऊन पालखी मिरवणूक होऊन महप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी शेठ काळे, मा. आमदार दिलीपशेठ मोहिते, मा. आमदार सौ. सुलभाताई गायकवाड़, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुरेश कौदारे, हुतात्मा राजगुरू पतसंस्था अध्यक्षदत्तात्रय वाळुंज,माथाडी कामगार नेतेमारुती कौदारे, आंबेगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्ष संजय कोकणे, कात्रज दूध संघाचे संचालक अरुणशेठ चांभारे, डेहणे आदिवासी सोसायटी चेअरमन रामचंद्र लांघी सह आदी मान्यवर उपास्थित राहणार आहेत तरी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्त युवा प्रतिष्ठान,हरिपाठ  सेवा मंडळ,श्री कागजादेवी सेवा मंडळ यांचे व समस्त ग्रामस्थ खरोशी यांचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version