सामाजिक
आपल्या “मायभूमीच्या उत्कर्षांसाठी सर्वोतोपारी मदत करणारा, तरुण नवउद्योजक”…. सचिन सहाणे
मंचर दि. (प्रतिनिधी) हे,..माय भु तुझे मी, फेडीन पांग सारे… आणील आरतीला हे सूर्य चंद्र,तारे”… स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या गीताच्या ओळी रेखाटत आपल्या जन्म भूमिबद्दल आदर व्यक्त केला आहे. याच आपल्या जन्मभूमीबद्दल आदर व्यक्त करीत आपण आपल्या बालवयातील कडू,गोड आठवणीचा ठेवा,आपल्या गावातील ज्या बाल मित्रांमध्ये तसेच आपले नातेवाईक, आप्तेष्ठ, गावातील प्रत्येक व्यक्तीसोबत जगलो. त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष किंबहुना अप्रत्यक्ष क्षणाचे पांग फेडणे तसें मात्र अशक्यच…
परंतु त्या आपल्या गावच्या मातीसाठी व आपल्या गावातील नागरिकांसाठी काहीतरी चांगले करून आपल्या गावातील पुढील पिढीला सक्षम घडविण्यासाठी, शक्य तेव्हढे निरपेक्ष भावनेने मदत करण्याची संधी मिळणे भाग्यचेच म्हणता येईल,
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या घोडेगाव येथे आपले बालपण घालवून आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी गरुड भरारी घेत विविध अडचणींवर मात करीत कर्नाटक राज्यात बेंगलोर या नवख्या शहरात जाऊन स्व हिंमतीने कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग उभा केला. दिवस रात्र अतोनात कष्ट करून आपले साम्राज्य निर्माण करत केले परंतु यात आपल्या मायभूमिला न विसरता तेथे राहणाऱ्या आपल्या गावच्या उत्कर्षांसाठी, येथील विद्यार्थ्यांच्या शौक्षणिक प्रगतीसाठी सर्वोतोपारी मदत करण्याची मनोमन इच्छा बाळगून या तरुणांने लाखो रुपयांची शाळेला मदत केली…हा तरुण उद्योजक म्हणजे सचिन भीमाशंकर सहाणे ….
उद्योजक सचिन सहाणे यांनी घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या नवीन सभागृह निर्मितीसाठी आपले कनिष्ठ बंधू कै. समीर सहाणे यांच्या स्मरणार्थ सातलाख एक्कावण हजार रुपयांची देणगी दिली आहे.त्याचप्रमाणे या आगोदर मागील वर्षी उद्योजक सहाणे यांनी तीं लाख रुपये बँकेत एफ डी करून त्याद्वारे मिळणाऱ्या व्याजतून घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेतील दहावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषक वितरण केले जाते.
दरम्यान घोडेगाव येथे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सवात ह उद्योजक सहाणे यांनी सात लाख एक्कावंन हजार रुपयांचा चेक संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्याकडे प्रदान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश काळे, कोशाध्यक्ष सोमनाथ काळे, सचिव विश्वास काळे, समन्वय समिती अध्यक्ष राजू काळे,सर्वश्री संचालक अजित काळे अक्षय काळे बी डी काळे कॉलेज चेअरमन अँड मुकुंद काळे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्रचार्य धनंजय पातकर, प्राचार्या डिसोजा मॅडम व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
December 30, 2024 at 11:36 am
पैशाने श्रीमंत झालेली माणसे आपल्या गावाला आपल्या माणसांना विसरतात . परंतू उद्योजक सचिन सहाणे यांनी दाखवुन दिले की माझे गांव माझी माणसं हे माझं सर्वस्व आहे . आणी म्हणूनच त्यांनी आपल्या गावच्या शाळेला साडेसात लाखांची देणगी दिली . अशा या उद्योजकाचे मनापासून आभार . त्यांना पुढील काळात खुप मोठे व्हावेत अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
Bobhata News
January 1, 2025 at 6:43 pm
👍