सामाजिक
“मंचर नगरपंचायतीच्या बोगस विकास कामे व लाल फितीच्या कारभारामुळे, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा”….
मंचर दि (प्रतिनिधी)- मंचर शहरात सुरु असलेली विकासाची कामे हि अतिशय नित्कृष्ठ पद्धतीची असून ठेकेदार काम करताना अतिशय धिम्या गतीने करीत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून मंचर नगर पंचायतीच्या लाल फितीच्या कारभराविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांचे वतीने देण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्यातील पहिली नगर पंचायत मंचर येथे झाली परंतु नगर पंचायतीची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकार अस्थिर झाले व यात मंचर नगर पंचायतीवर प्रशासकाची नेमणूक झाली प्रशासकीय कारभारात गावंच्या पुढील भवितव्यचा किंवा नागरिकांच्या सुविधाचा विचार ना करता मनमानेल त्या पद्धतीने काही ठरविक कथाकथित पुढारी यांच्या दबावाखाली बोगस पद्धतीने शहरात विकासकामे सुरु असल्याची संपूर्ण शहरभर चर्चा सुरु आहे.त्यामुळे सुरु असलेल्या कामाचे गुणवत्ता नियंत्रण मंडळ कार्यालय पुणे यांच्या मार्फत चौकशी होऊनच संबंधित ठेकेदारांची बिले अदा करण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
दरम्यान शहरात अनेक ठिकाणी नवीन इमारती बांधकाम सोबत रस्त्याच्या दुरुस्ती करणाची कामे सुरु आहेत यात सिमेंट काँक्रेट पिव्हिंग ब्लॉक बसविणे या कामांची गुणवंत्ता अनेकठिकाणी प्रचंड खालवलेली असल्याचे दिसते रस्ते बांधताना अनेक ठिकाणी खालीवर असून रस्ते समतल नाहीत. शहरात विविध भागात पेव्हिंग ब्लॉक बसविताना ते व्यवस्थित बसविल्याचे दिसत नाहीत. तसेच घोडेगाव रस्त्याच्या बाजूला मंचर पोस्ट ऑफिस समोरच्या रस्त्याचे काम दोन महिन्यापासुन रखडले असून याठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर सांडपाणी साचत असल्याने याठिकाणी डेंगू चिकन गुनिया सारख्या रोगाना ग्रामस्थ बळी पडत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
मंचर शहरात अनेक ठिकाणी सांडपाणी निचारा व्यवस्थेची दुरावस्था असून पंचायातिकडून त्याचे कार्यवाही होण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.त्यामुळे काही समाजसेवी संघटना कडून वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार करण्यात येणार असलेल्याचे सांगितले आहे.
(मंचर नगरपंचायतीची ” नित्कृष्ठ दर्जाची विकास कामे व लाल फितीच्या करभाराचा भांडाफोड करणारी मालिका सुरु करीत आहोत. ज्या ग्रामस्थ्यांच्या काही तक्रारी असतील त्यांनी लेखी स्वरूपात पाठवाव्यात)