सामाजिक
“अलिबागच्या समुद्र किनारी, “सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या मित्रांचा अनोखा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न”….
मंचर दि २७ (सदानंद शेवाळे) : जीवन आनंदी, समाधानी जगण्यासाठी व एकमेकांची मदत व्हावी या उदात्त हेतूने काही अनोळखी तर काही ओळखीचे मित्र नुकतेच एकत्र येत अनोख्या स्नेह मेळावा अलिबाग येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला
मैत्रीला मर्यादा नाहीत जीवनात असलेली प्रत्येक कडू गोड गोष्ट समजावून घेऊन मदतीला सदैव उभा असतो तो मित्र होय. सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यासारख्या इतर समाज माध्यमांवर झालेले मित्र सहवास मैत्रीचा या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत समुद्रातील अथांगअशा जलाशयातील अनंत थेंबांच्या एकरूपतेप्रमाणे समुद्रातील त्या अगम्यहं उंचलांटाच्या साक्षीने अनोख्या स्नेह मेळाव्याचे आयोजन समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या अलिबाग येथे करण्यात आले.
खरंतर या आगळ्यावेगळ्या स्नेह मेळाव्याचे अर्थात गेट टुगेदरचे यशस्वी आयोजन मुळचे शिवजन्मभूमी जुन्नर चे भूमिपुत्र व सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले उद्योजक सिताराम पारखे, माया पारखे,ऋषिकेश कामत, उदय शिंदे, वृंदा कतारे, साधना बर्गे यांनी केले. यात मुंबई,कोकण,पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ, मराठवाड्यातील मित्रांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान या स्नेह मेळाव्यासाठी उद्योजक किरण वाजगे, सुभाष दादा टाव्हरे, सुनयना राजे निंबाळकर, शोभा टाव्हरे, ज्येष्ठ कलाकार राजु चौगुले, सदानंद शेवाळे, रेणू पाठक, लक्ष्मी सातपुते, माया पाटील, मनिषा चौघुले, ज्योत्स्ना गागरे, सुरेखा तोतरे, दीपिका बेल्हेकर, ज्योती बेल्हेकर, संतोष शेळके, प्रकाश कदम, उत्तम गाढवे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, शहाजी पाटील, दिपक बेल्हेकर, सुनील पै, नितीन लागे, समीर गरूड, भारती चौधरी, मेघा, स्मिता, सुनिता नानगुडे, माया चव्हाण, प्रशांत म्हात्रे, बाळासाहेब वायकर, विजय राजपूत, अवधूत चव्हाण, शशिकांत वांळुज, राजकुमार गुंजाळ, संतोष थोरात यांनी सहभाग घेतला.
सहभागी सर्वच सदस्यांनी अलिबाग येथील बीचवर आपल्या अंगी असलेली कला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले यावेळी नृत्य, विविध खेळ, कविता सादरीकरण, गीत गायन आदी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात सहभाग घेत भोजनाचाही मनमुराद आनंद सर्वांनी लुटला.