मनोरंजन
समाजमनाच्या “सुवर्ण क्षितिजावर” अधीराज्य गाजविणारे मंचरचे सुपुत्र विश्वासराजे ….
मंचर दि (प्रतिनिधी) आपल्या मुलगा क्षितिज व सून चि सौ कां सुवर्णा यांच्या विवाह कार्यात जुन्या नव्या सवंगड्याना एकत्रित पाहून मन आभाळा सारखे प्रफुल्लित झालेल्या व जणमानसांना सदैव मदतीचा हात पुढे करीत त्यांच्यात सक्षमता निर्माण करत सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनावर अधिराज्य गजवीणारे… विश्वास राजे तुम्ही कार्याने खरेचंच थोरआहात (थोरात)
“शिवसैनिक” हा शब्द ऐकला कि, अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. गेल्या दशकात राजकीय क्षेत्रात शिवसेनेचे दोन भाग होऊन वाता- हात झालीअसल्याचे अनेक माध्यमातून सांगियले जातं असले तरी, शिव सैनिक आजही निडर भावनेने आणि प्रचंड त्वेशाने ऐशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत आजही काळ्या कठीण पाषाणाप्रमाणे समाजाच्या हितासाठी सातातत्याने अहोरात्र समाजकार्य काम करीत आहेत
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराने प्रभावीत होत सुमारे १९८४ मध्ये आंबेगाव तालुक्यात मंचर मध्ये ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली. यावेळीचे जुन्या काळातील शेकडो शिवसैनिक विवाहमंगल कार्यात एकत्रित आलेले दिसले ते विवाहकार्य होते. आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र आणि ज्यांनी पोलीस प्रशासनात आपले कर्तव्य बाजावताना समाजकार्य डोळ्यांसमोर ठेवून नोकरीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ज्ञाय मिळवून देण्यासाठी सातात्याने प्रयत्न केले. ते मंचरगावचे सुपुत्र निवृत्त उपविभागीय पोलीस अधीक्षक विश्वासराजे थोरात यांचा मुलगा कु क्षितिज व ढगे परिवारातील चि. सौ. कां सुवर्णा यांचे विवाह सोहळ्याचे….
यावेळी शिवसेना उबाटा चे नेते राजाराम बाणखेले, शिवसेना माजी जिल्हा उपप्रमुख विजय पवार, माजी तालुका प्रमुख दिलीप पवळे अँडसुनील बांगर माजी तालुका प्रमुख बबनराव गव्हाणे, बबनराव सैद माजी शिवसेना तालुका संघटक सुरेश चव्हाण, बाळासाहेब काळे, सुभाष वाबळे, मोहन पवार, जालिंदर बिबवे दिलीप चासकर उत्तमराव गव्हाणे रंगानाथ थोरात अरुण नाना बाणखेले बाळासाहेब थोरात,वसंतराव बाणखेले गणपतराव चासकर विठ्ठल वळसे आदी जुने शिवसैनिक उपास्थित होते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे निमित्ताने हभप पांडुरंग महाराज येवले, ह भ प संतोष महाराज बढेकर सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई आढळराव , मंचरचे माजी सरपंच व शिवसेना तालुका प्रमुख दत्तात्रय गांजाळे, भीमाशंकर सह साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब बाणखेले, शिवसेना शहर प्रमुख विकास जाधव, आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कोकणे (पाटील) जेष्ठ पत्रकार सदानंद शेवाळे, दैनिक सकाळचे जेष्ठ पत्रकार दिलीप वळसे(पाटील ),जे.के थोरात, सुनील बाणखेले, संतोष बाणखेले,आदी मान्यवर उपस्थित होते.